success story of kavita gosavi in generic medical startup business  Sakal
पुणे

Success Story : महिला उद्योजिकेची यशोगाथा : नव्या व्यवसायाला ‘जेनेरिक’ची मात्रा; औषधविक्रीतून देशात सर्वाधिक उलाढाल

नव्या क्षेत्रात करिअर करायचं होत म्हणून आयटीतील नोकरी सोडली. घरातील सोनं विकून स्वतःचा जेनेरिक औषधांचा व्यवसाय सुरू केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नव्या क्षेत्रात करिअर करायचं होत म्हणून आयटीतील नोकरी सोडली. घरातील सोनं विकून स्वतःचा जेनेरिक औषधांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाची ऊर्मी आणि गरजवंतांना अल्पावधीत औषधे उपलब्ध करून देण्याची जिद्द,

यामुळं एका महिलेने सुरू केलेला व्यवसाय आज उलाढालीच्या बाबतीत देशात सर्वोच्च पातळीवर पोहोचला. विशेष म्हणजे एक पाय ४५ टक्के अपंग असतानाही सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी हा टप्पा गाठला.

कविता गोसावी असं त्या उद्योजिकेचं नाव आहे. २०१७मध्ये त्यांनी येरवड्यात ‘येरवडा जेनेरिक मेडिसिन स्टोअर’ नावाने दुकान सुरू केलं. उद्‍घाटनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा नऊ हजारांचा व्यवसाय झाला. सहा महिन्यांतच त्यांचे दुकान राज्यात सर्वाधिक उलाढाल करणारे ठरले. सुमारे ८० लाखांच्या खरेदी-विक्रीचा टप्पा पार केला.

कविता यांचा औषधविक्रेत्यांना सल्ला

  • विक्रेत्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे

  • नागरिकांमध्ये जेनेरिक औषधांबाबत जनजागृती करावी

  • जेनेरिक गोळ्यांबाबत विश्‍वास निर्माण करून द्यावा

  • जनजागृतीमध्ये सातत्य ठेवावे

पैशांबाबत घरी माहीत नव्हते...

मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय जमेलच असे नाही. तुम्ही सर्व बचत एकाच धंद्यात गुंतवली आणि त्याला यश आले नाही; तर मोठे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ‘तू नोकरी कर’ असे मला कुटुंबीयांनी सुचवलं. मात्र व्यवसाय करण्याचं आम्ही निश्चित केले होतं. माझी ५० हजारांची बचत आणि पतीची नोकरी गेलेली असताना आम्ही दुकान सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम होतो.

सुरुवातीला भांडवलाची कमतरता होती. त्यामुळे आम्ही सोनं विकलं. त्याबाबतची माहिती कुटुंबीयांना न देता उद्योग सुरू केला. सुरुवातीचे सहा महिने आम्ही घरच्यांना पैसे कुठून आणले हे सांगितले नव्हतं. सर्व सुरळीत झाल्यानंतर आम्ही घरच्यांना माहिती दिली, असे कविता यांनी सांगितलं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर मी पुणे आणि मुंबईत अनेक बड्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१७मध्ये माझ्या आईला रुग्णालयात दाखल केलं. त्या वेळी लक्षात आलं की अनेकांना वैद्यकीय खर्च परवडत नाही. महागड्या गोळ्या घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गरिबांसाठी किंवा कमी पैसे असलेल्यांसाठी जेनेरिक औषधांचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला.

- कविता गोसावी, संस्थापक, विघ्नहर्ता जेनेरिक मेडिसिन स्टोअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT