Successful export of Purandar GI tagged figs to Hong Kong pune business
Successful export of Purandar GI tagged figs to Hong Kong pune business  sakal
पुणे

Pune News : पुरंदरच्या जीआय टॅगच्या अंजिरांची हाँगकाँगला निर्यात यशस्वी

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : येथील पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि सायन अॅग्रिकोसद्वारे पुरंदरची जी.आय. टॅग असलेले पुना फिग जातीचे `अंजीर` `सुपर फिग्ज ब्रँडनेम`ने भारतातून हाँगकाँगमध्ये पोचली.

पुरंदर अंजीरांची ही चाचणीनंतरची हाँगकाँगसाठीची पहिली व्यावसायिक खेप यशस्वीपणे निर्यात करण्यात आली. भारत सरकारच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या `अतुल्य भारत` यांच्या 'व्हिजिट इंडिया 2023' मिशनसाठी या निर्यातीच्या मालावर ब्रँडिंग देखील या निर्यात मोहीमेला पाठींबा देण्यासाठी होते.

पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीद्वारे अगोदर हॅम्बर्गला (जर्मनी) आणि नंतर युरोपियन देशापैकी नेदरलँडला भारताची पहिली नमुना खेप निर्यात केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर नुकतेच दक्षिण आशियाई देशांमध्ये म्हणजेच हाँगकाँगला जी.आय. टॅग केलेल्या पुरंदर अंजीरसाठी व्यावसायिक मालाची ऑर्डर मिळाली होती.

नुकतीच अंजीर स्वरुपातील या शेतीमालाची ही निर्यात केली आणि आज आयात करणार्‍या हाँगकाँगच्या ग्राहकांकडून सविस्तर सकारात्मक अभिप्राय मिळाल्यानंतर.. आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, ही मालाची निर्यात यशस्वी झाली.

अंजीर चांगल्या व गुणवत्तापूर्ण स्थितीत पोचला गेला. त्याचा हाँगकाँगमध्ये स्वीकार चांगला झाला आणि पुढील ऑर्डरसाठी आयात करणार्‍या लगतच्या देशांमधूनही नवी आशा निर्माण झाली., असे पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष रोहन सतिश उरसळ यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या प्रकल्पावर काढणी, हातळणी, टिकाऊपणा, पॅकिंग, गुणवत्ता, निर्यात व तेथील चाचण्या आदींवर नऊ वर्षे काम केल्यानंतर अंजीर निर्यातीसाठी एका - एका देशाचे दरवाजे खुले होतायेत.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वीच एप्रिल 2022 मध्ये ट्विट करुन कंपनीस प्रेरणा दिली होती. हा एक व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्प बनवण्यासाठी आम्ही पावले उचलू ज्यामुळे आपल्या देशाला आपल्या जीआय टॅग केलेल्या वस्तूंमध्ये जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल.,

असेही ते त्यात म्हणाले होते. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनीही तेंव्हा आमच्या प्रयत्नांचे कौतुकही केले होते व त्यांनी अत्यंत नाशवंत अंजीर निर्यात करण्याची दृष्टी कंपनीला सुरवातीपासूनच दिली होती. बारामतीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी तर निर्यातीच्या व प्रक्रीयेच्या प्रत्येक प्रयत्नाचे कौतुक केले.

खा. सुळे जणु जीआय टॅग केलेल्या पुरंदर अंजीरच्या खऱ्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत., अशी भावना श्री. उरसळ यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.आमचे सर्व शेतकरी आणि भागीदार पिल्झ शिंडलर, जीएमबीएच आंद्रेस शिंडलर, शिवाय चिरंजीवी अल्लासंद्र राजन्ना, मधु के एम ,उन्मेष सुर्यवंशी, जर्मनीची उपकंपनी सायन अॅग्रिकोस यांनी निर्यातीमध्ये महत्वाची मदत केली.

पीक विज्ञानचे डी. नरेन, अजित चहल, गेरहार्ड अॅडम, संजय नारंग, गणेश साळुंखे, चेतन भोट, हायटेक अॅग्रो सोल्युशन्स स्टेपॅक एलए लिमिटेडचे केतन वाघ आदींनी पॅकेजिंग प्रक्रीयेत मार्गर्शन केले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जी.आय. कमोडिटीजचा जगभरात प्रचार केल्याबद्दल त्यांचे या निर्यातीनंतर कंपनीने आभार मानले.

तरुण उद्योजकांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना जागतिक स्तरावर उत्पादनांची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात नवीन उंची गाठण्यासाठी श्री. मोदी यांनी प्रवृत्त केले., असेही सांगण्यात आले.

निर्यातीतील महत्वाचे मुद्दे...

  • हाँगकाँगच्या चाचणीत 50 किलो अंजीर पाठविले होते

  • आता निर्यातीच्या आॅर्डरप्रमाणे पहील्या खेपेत 550 किल अंजीर पाठविले

  • जर्मन, नेदरलँडची निर्यात पहील्या खेपेनंतर तांत्रिक कारण अडली

  • हाँगकाँगची मात्र दर आठवड्याची आॅर्डर मिळाली

  • पुढे हाँगकाँगची निर्यात वाढेल व शेजारील देशही मिळण्याची आशा

पुरंदरची ही स्थानिक टिम राबली...

पुरंदरचे अंजीर नेहमीच अत्यंत नाशवंत मानले जायचे, त्यामुळे त्याची पोहोच दूरच्या बाजारपेठेपर्यंत मर्यादित होती. तथापि, आमची कंपनीची टीम आणि आमच्या भागीदारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आम्ही आता आमचे ताजे अंजीर जागतिक बाजारपेठेत व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि टिकाऊ फार्म टू टेबल मॉडेलसह घेऊन जात आहोत.

याकामी पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनी लि. चे संचालक समील इंगळे, गणेश कोलते, सागर लवांडे, अमन इंगळे, अतुल कडलग, सागर धुमाळ, रुपाली कडलग, संपत खेडेकर, रामचंद्र गुरुजी खेडेकर, दिपक जगताप, ज्ञानेश्वर फडतरे आदींनी विशेष परिश्रम घेतले., असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT