Lata Mangeshkar Sakal
पुणे

गीतावेगळी लता...

लता मंगेशकर यांची ‘प्रख्यात गायिका’ इतकीच मर्यादित ओळख निश्चित नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. गाणं सोडून त्यांच्या पहिलं वेगळेपण म्हणजे त्या उत्तम छायाचित्रकार होत्या.

सुधीर गाडगीळ

लता मंगेशकर यांची ‘प्रख्यात गायिका’ इतकीच मर्यादित ओळख निश्चित नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. गाणं सोडून त्यांच्या पहिलं वेगळेपण म्हणजे त्या उत्तम छायाचित्रकार होत्या.

लता मंगेशकर यांची ‘प्रख्यात गायिका’ इतकीच मर्यादित ओळख निश्चित नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. गाणं सोडून त्यांच्या पहिलं वेगळेपण म्हणजे त्या उत्तम छायाचित्रकार होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिताफीने सुटका करून घेतली त्या पन्हाळगड दीदी मनसोक्त छायाचित्रण करत होत्या. मोहन वाघ यांच्या बरोबर कित्येक वेळा दीदींशी फोटोग्राफी या विषयावर गप्पा झाल्या. त्यात वाघ म्हणतात, ‘‘गडावर उभे राहून दीदींनी गळ्यात अडकवलेला फोटो क्लिक केला की, गडाच्या पायथ्याशी चरणारी शेळी, आकाशात मनमुरादपणे विहरणारा पक्षी आणि वरचं निळंशार आकाश ही तीनही दृष्य एकाच ‘फ्रेम’मध्ये त्या अप्रतिमपणे आणतात.’’ अशी उत्तम फोटोग्राफी दीदींची होती.

दीदी या बहुभाषिक होत्या. हिंदी गीतांमध्ये जग गाजविलेल्या दीदी या उर्दू, पंजाबी, बंगाली भाषेतील लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याची क्षमता असलेल्या होत्या. त्यांनी अधिकाधिक गाणी ही हिंदी भाषेतून गायली. मात्र, त्यांची पहिलं-वहीलं सगळं काही मराठीत आहे. दीदींची ओळख अभिनय म्हणूनही आहे. ‘किती हसाल’ आणि ‘पहिली मंगळागौर’ या दोन चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. दीनानाथ मंगेशकर यांचा नाटकाचा अंश त्यांच्या अंगात होता. ‘मला नाटकीपणा येत नाही. पण, नक्कल बरी करता येते मला.’ असे म्हणत त्या अप्रतिम नकला करून दाखवायच्या. ही नक्कल त्या समोरच्या व्यक्तीच्या फक्त आवाजाची करायच्या नाहीत. तर, ती त्या माणसाची विशिष्ट लकब उचलून त्या बोलत होत्या.

त्यांनी ‘आनंदघन’ या टोपण नावानं संगीत दिले. बऱ्याच जणांची समजूत आहे की, हे टोपण नाव भालजी पेंढारकर यांनी दिले आहे. ते त्यांचं स्वतःचंच आहे. ‘आनंदवन भूवनी’ हे गाणं गाताना ‘आनंदघन’ हे नाव सुचले. याच नावानं पुढे त्यांनी संगीत दिले. त्या ‘आनंदघन’ नावाने सात चित्रपटांना संगीत दिले. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्या अजिबात गाजावाजा न करता वेळ काढायच्या. १९७२ च्या बांगलादेश युद्धातील जखमी जवानांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या. तिथे एका जवानांनी गाणे गाण्याचा आग्रह केला. त्या वेळी त्यांनी जवानांचे महत्त्व सांगणारी कुसुमाग्रज यांची कविता म्हटली. अत्यंत सामाजिक भान असणारी दीदी नावाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. त्या पार्श्वगीत गायक बरोबरच फोटोग्राफर, बहुभाषक, अभिनेत्री, नकलाकार, संगीतकार, नेमबाज, सामाजिक भान ठेवणारी संवेदनशील व्यक्ती होती.

नेमबाजी करायची वेळ आली नाही...

दीदींना भालजी पेंढारकर म्हणाले होते, पन्हाळगडासारख्या ठिकाणी एकटी रहातेस, तर स्वसंरक्षणासाठी नेमबाजी शिकलीच पाहिजे. त्या एका वाक्यावर दीदींनी अक्षरशः जिगरीवर नेमबाजी शिकली. दीदींनी नेमबाजीचे व्यवस्थित प्रशिक्षण घेतले होते. त्या बद्दल बोलताना त्या नेहमी म्हणायच्या, ‘मी नेमबाजी शिकले उत्तम. पण, ती करायची वेळ कधी आली नाही, हे माझं भाग्य.’

दीदी-मोदींचं अनोखं नातं

पुणे - ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान व्हावे,’ अशी स्पष्ट इच्छा नोव्हेंबर २०१३ मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी उघडपणे सर्वप्रथम व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते होते. मोदी लतादीदींना मोठी बहीण मानत होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या उद्‍घाटनप्रसंगी त्यांनी ही इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. त्या वेळी त्या भाषणात म्हणाल्या होत्या, ‘हम जो चाहते है, आप जो चाहते है के नरेंद्रभाई हमे ‘पीएम’ की जगा पे नजर आये।’ दीदींच्या या वाक्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला होता. तोच सूर पकडून दीदी पुढे म्हणाल्या होत्या, ‘आपकी तालीयोंने बता दिया के आप भी यही चाहते है।’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT