MGV26B15399
मंगळवेढा ः श्रीसंत दामाजी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या समारंभ प्रसंगी संचालक मंडळ.
स्पर्धेत टिकण्यासाठी कमी दिवसात जादा गाळप करावे लागेल
शिवानंद पाटील; दामाजी साखर कारखान्याचा गाळप सांगता
मंगळवेढा, ता. २० ः साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढील काळात कमी दिवसात जास्त गाळप करावे लागणार आहे. संस्थापक स्व. मारवाडी वकील, संस्थापक उपाध्यक्ष स्व. रतनचंद शहा व माजी चेअरमन स्व. चरणूकाका पाटील यांनी दामाजीला शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून नावारुपाला आणले त्यांच्या विचारांवर संचालक मंडळ कामकाज करीत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू हंगामाच्या सांगता समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक राजेंद्र चरणूकाका पाटील होते. संचालक महादेव लुगडे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सभासद, ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी यांचे सहकार्याने डिसेंबर २०२५ अखेर २८५० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊसबिल दिले आहे. तसेच तोडणी वाहतूक बिलेही १५ जानेवारी २०२६ अखेर अदा केली. कारखान्याने आजअखेर तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून ३,००,५६४ क्विंटल साखर उत्पादन केले. कारखान्याने गेली तीन वर्षे स्पर्धेत राहून एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर, कामगारांचे पगार दरमहा दिले.
यांचा केला सन्मान
या हंगामात ऊसतोडणी व जास्तीत जास्त ऊस वाहतूक केलेले पहिले तीन ठेकेदार भिवा शिंदे, सुनील जाधव, प्रशांत ठेंगील, वसंत दोलतडे, राजकुमार आसबे, तात्यासाहेब घोडके तसेच बैलगाडी तोडणी वाहतूक ठेकेदार भाऊसाहेब पठाडे, रमेश पठाडे, अजिनाथ पन्हाळकर, मशिनने तोडणी वाहतूक ठेकेदार सुनील लुगडे, शिवाजी आवताडे, महादेव लोखंडे आदींचा संचालक मंडळाचे वतीने सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.