Sugar production decreased in state ethanol increased decrease of 33 lakh tonnes
Sugar production decreased in state ethanol increased decrease of 33 lakh tonnes  sakal
पुणे

Sugar Production : राज्यात साखर उत्पादन घटले, इथेनॉल वाढले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील चालू वर्षाची ऊस गळीत हंगाम संपला असून यंदाच्या गळीत हंगामात साखर उत्पादन घटले असून, याउलट इथेनॉलच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात ३३ लाख टनांनी घट झाली असून इथेनॉल उत्पादनात मात्र १८ कोटी लिटर्सने वाढ झाली आहे.

यंदा राज्यातील साखर उत्पादनात घट होऊनही, देशात साखर उत्पादनात यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी (ता.४) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने आता साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर देऊ लागले आहेत. कारखान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी हे चांगले आहे. कारण इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यांना त्वरित रोख रक्कम मिळत आहेत.

त्यामुळे ही बाब कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. महाराष्ट्रात यंदा झालेल्या हवामान बदलाचा किंवा अवेळी पावसाचा ऊस पिकावर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. अवकाळी पावसामुळे अन्य पिकांचे नुकसान होत असले, तरी ऊस त्यात दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूरच्या पुरामध्ये उसाचे पीक राहिले. उलट तेथील ऊस उत्पादन सात टनाने वाढले. दुष्काळी भागात ऊस राहावा का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत असतो.

पण मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा या पिकावर विश्वास आहे.हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत असला, तरी अवकाळी पाऊस, गारपीट याचा ऊस पिकाला तितकासा फटका बसलेला दिसत नाही. उसासाठी भरपाई दिल्याचे एकही उदाहरण सापडत नाही.

आता इथेनॉलकडे वाढता कल आहे. मागच्या वर्षी इथेनॉल निर्मितीकडे १२ लाख टन साखर वर्ग झाली होती. यंदाच्या गळीत हंगामात त्यात आणखी चार लाख टनांची भर पडून ती यंदा १६ लाख टन झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन यंदा कमी झाले असले, तरी ४ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकरिता गेली आहे, याचाही विचार केला पाहिजे.’’

यंदाचा ऊस गळीत हंगाम दृष्टीक्षेपात...!

- एकूण ऊस गाळप --- १०५२.८८ लाख मेट्रिक टन

- एकूण साखर उत्पादन --- १०५.३१ लाख मेट्रिक टन

- सरासरी साखर उतारा --- १० टक्के

- सरासरी गाळप दिवस --- १२१

- गाळपाचे कमाल दिवस --- १६४

- किमान गाळप दिवस --- ०७

- स्थापित गाळप क्षमतेत वाढ --- प्रतिदिन ०.४५ लाख टन

‘यापुढे दरवर्षी १५ एप्रिलला हंगाम संपणार’

चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात साखर कारखाना विस्तारास परवानगी देण्यात आल्याने प्रतिदिन गाळप क्षमतेत ४५ हजार टनाने वाढ झाली आहे. पुढील वर्षी आणखी प्रतिदिन ३० हजार टन क्षमता वाढ अपेक्षित आहे. यामुळे यापुढे साखर कारखाने कमाल सहा महिने इतका काळ चालतील.

सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कारखाने चालू राहणार नसल्याने, यापुढे दरवर्षीच्या 15 एप्रिलच्या पुढे गळीत हंगाम कधीच चालू राहणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे यापुढे दरवर्षी १५ एप्रिलला ऊस गळीत हंगाम संपेल, असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT