Sugar
Sugar 
पुणे

औषधोपचारासाठी चोरली साखर!

सकाळवृत्तसेवा

पुणे - माजी सैनिकांच्या मुलांच्या ताटातील ओरबडून अधिकारी आणि अधीक्षकांनी स्वत:ची भूक भागवून घेतली. हे कमी म्हणून की काय, वसतिगृहातून साखर चोरण्यात आली. त्यावर चौकशीत आलेले उत्तर गमतीशीर आहे. साखर चोरली कशासाठी?... तर औषधोपचारासाठी.

पर्वतीतील वसतिगृहातील किराणामालातून अनेक वस्तू गायब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी पाळत ठेवून साखरेची चोरी पकडली. अन्नधान्याची खोली गोविंद साळुंखे यांच्या देखरेखीखाली असताना तेथून दहा किलो साखर गायब झाली. विद्यार्थ्यांनी याबाबत साळुंखे यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर विद्यार्थ्यांनीच चौकीदाराकडून ती हस्तगत केली.

चौकशी समितीने या मुद्‌द्‌यावर जबाब घेतले. तत्कालीन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिंदे आणि जोशी यांनी याबाबत चौकीदाराचा जबाब घेतला. त्याने औषधोपचारासाठी ही साखर घेतली, असे सांगितल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. विद्यार्थी मात्र यावर समाधानी नाहीत. नाव चौकीदाराचे आणि काम दुसऱ्याचे, असा हा प्रकार आहे. धान्य ठेवण्याची जागा अधीक्षकांच्या नियंत्रणात आहे, तर चौकीदार तेथे जाईल कसा, हा त्यांचा सवाल आहे.

वसतिगृहात दोन सहायक अधीक्षक आहेत. त्यांना विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्यादेखील माहीत नाहीत. ते त्यांचे काम सोडून पत्रव्यवहार, टायपिंग, विद्यार्थी-कर्मचारी यांची हजेरी आणि साळुंखे यांनी नेमून दिलेली कामे करीत असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.

साळुंखे हे २०१४ पासून वसतिगृहाचे काम पाहत आहेत. याच सालात साताऱ्यावरून फर्निचर खरेदी करण्यात आले. हे फर्निचर निकृष्ट असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. जुलै २०१८ नंतर विद्यार्थ्यांचे मासिक संमेलन झालेले नाही, असे समितीने म्हटले आहे. साळुंखे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांच्यातील वादामुळेच हे संमेलन झाले नसल्याचे विद्यार्थी सांगतात.

वातावरण अनुकूल हवे
संदीप सोळंके हे २०१४ मध्ये वसतिगृहात होते. ते सध्या औरंगाबाद येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करीत आहेत. त्यांना वसतिगृहाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘आम्हाला खूप त्रास झाला आहे, त्याबद्दल तक्रारीही केल्या होत्या. साळुंखे यांचे बरेच काही चुकले आहे; पण सरकारची ही वसतिगृहे आहेत, म्हणून गरिबांची मुले चांगल्या पदावर जाऊ शकतात. त्यादृष्टीने वसतिगृहातील वातावरण अनुकूल हवे. विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, त्याला वसतिगृहात येण्या-जाण्याच्या वेळेबाबत थोडे स्वातंत्र्य हवेच.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT