पुणे

खर्डा परिसरातील शेतमजूर कारखान्याच्या वाटेवर

CD

KRA26A02599
खर्डा ः कारखाना परिसरात राहण्यासाठी पालाची उभारणी करताना ऊसतोड मजूर.

खर्ड्यातून ऊसतोड मजुरांचे स्थलांतर
ग्रामीण भाग ओस ः रोजगारासाठी औद्योगीकरणाचा मागणी
खर्डा, ता. ४ : दसऱ्याच्या तोंडावर खर्डा व जामखेड परिसरातील अनेक कुटुंबे ऊसतोडणी मजूर म्हणून साखर कारखान्यांच्या दिशेने स्थलांतरित होऊ लागली आहेत. यावर्षीच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे, तसेच चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातून मजुरांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गावच्या गावे ओस पडू लागली आहेत.

मजूर आपल्या मुलाबाळांसह आणि पाळीव जनावरांसह संसाराचे साहित्य बैलगाड्या किंवा ट्रॅक्टरमध्ये भरून कारखान्यांच्या दिशेने निघत आहेत. या स्थलांतरामुळे लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ती शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या समस्येवर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरवर्षी होणारे मोठे स्थलांतर रोखण्यासाठी जामखेड तालुक्यात मोठे उद्योगधंदे आणि औद्योगीकरण आणण्याची गरज आहे. शासनाने स्थानिक पातळीवर कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
----------
आर्थिक अडचणींमुळे मजुरीचा करार
घरगुती गरजा, मुलामुलींची लग्ने, घरबांधणी, शेतीची कामे किंवा आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी मजूर कारखान्यांच्या मुकादमांकडून १ ते १.५ लाख रुपयांपर्यंत उचल (ॲडव्हान्स) घेतात. या पैशांची फेड करण्यासाठी मजूर पुढील ६ महिने कारखान्यांवर ऊसतोडणीचे कष्टाचे काम करतात. विजयादशमीपर्यंत (दसरा) कारखान्यांचे बॉयलर पेटत असल्याने त्यापूर्वीच मजूर कारखान्यांच्या परिसरात झोपड्या उभारून राहू लागतात. उसाच्या वाढ्यावर (पाला) जनावरे जगवता येतील, या आशेने मजूर आपल्यासोबत गुरेढोरेही घेऊन जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT