पुणे

‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वाढला उसाचा गोडवा

CD

खुटबाव, ता. १५ : खुटबाव (ता. दौंड) येथील उच्चशिक्षित पदवीधर शेतकरी महेंद्र थोरात यांनी ३० एकरामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करत सलग सहा वर्षे आडसाली उसाचे एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेत विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा त्यांनी सेंद्रिय शेती, योग्य नियोजन, एआय तंत्रज्ञानाच्या जोरावर उसाचे अधिक उत्पादन मिळविण्यात यश मिळवले आहे. दुष्काळी परिस्थिती असताना त्यांनी १०० टन उत्पादन घेत उसाच्या उत्पन्नाचा गोडवा अनुभवला आहे.

शेतीची मेहनत करताना योग्य काळजी घेतली जाते. दर दोन वर्षांनी शेतीच्या मातीची तपासणी होती. सतत ऊसपीक न घेता अधून मधून शेतामध्ये धैंचा, ताग, हरभरा ही पिके घेतली जातात. ऊस लागवडीपूर्वी शेतीला मोठा सेंद्रिय डोस दिला जातो. यामध्ये १४ ते १५ ट्रेलर शेणखत, चार ट्रेलर कोंबडखत, सहा ट्रेलर मळी या सर्वांचा एकत्रित डोस जेसीबीच्या साह्याने हा सर्व डोस ऊस शेतीला दिला, असे थोरात यांनी सांगितले.

अशी केली शेती
- ८६०३२ या जातीचे लांब कांड्यांचे, जाड बेण्याची निवड
- साडेचार ते पाच फुटी पट्टा सरी
- जून व जुलै महिन्यामध्ये लागण
- उसाचे बेणे स्वतःच्या शेतीत तयार केले
- १५ दिवसांनी फुटवे आल्यानंतर हुमणी व इतर रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी केली
- ऊस दोन फूट उंच झाल्यानंतर एकरी चार ट्रेलर कोंबडखताचा डोस
- एआय तंत्रज्ञान


जीवामृताचा वापर
एआय तंत्रज्ञानाने ऊस बांधणी झाल्यानंतर रासायनिक खते व दर तीन महिन्यांनी शेतीला जीवामृत दिले जाते. मोठा ऊस झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी व औषध फवारणी होते. ऊस ४० ते ४५ कांडी वाढला असून श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याला जात आहे.
ऊस शेतीसाठी अनेक पुरस्कारप्राप्त महेंद्र थोरात यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अंकुश चोरमले यांचा सल्ला लाभला.


सलग सहा वर्षांतील एकरी मिळालेले उत्पादन (टनांत)
२०२०-२१........१०२
२०२१-२२........१०५
२०२२-२३........१११
२०२३-२४........१०७
२०२४-२५........१०२
२०२५-२६........१००

सहा वर्षांपूर्वी शेती पाण्यासोबत केली तेव्हा एकरी ७० टन उत्पन्न निघायचे. शेतीमध्ये आधुनिकता आणल्याने उत्पन्न वाढले. याशिवाय केळी, हरभरा व कांदा पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षी २४ गुंठे क्षेत्रामध्ये ३४ पोती भुईमुगाचे उत्पादन घेतले आहे.
- महेंद्र थोरात, ऊस उत्पादक शेतकरी

04075

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT