पुणे

विधायक....अनगरच्या पाटील महाविद्यालया कडून ऊसतोड कामगारांच्या मुलांना गणवेश वाटप.

CD

ANR26B02876
अनगर ः पाटील महाविद्यालय व युगंधर फाउंडेशनकडून ऊसतोड कामगारांच्या मुलांना सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना गणवेशाचे वाटप
अनगर, ता. १९ ः येथील बाबूराव पाटील कला व शास्र महाविद्यालय व युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्यावरील ऊसतोड कामगारांच्या मुलांना गणवेशाचे वाटप राजन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राजन पाटील यांनी साखरशाळेत राबविलेल्या उपक्रमाचे व युगंधर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी युगंधर फाउंडेशनच्या सचिव प्रा.रश्मी माने यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक कामाचा आढावा प्रास्ताविकमध्ये घेतला. महाविद्यालयातील विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी साखरशाळा या शासनाच्या उपक्रमाविषयी व युगंधर फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. या साखरशाळेमध्ये ऊसतोड कामगारांची मुले ही बीड, धाराशिव, अहमदनगर व लातूर जिल्ह्यातील एकूण ९० मुलांना गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी लोकनेते शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे, मुख्य शेतकी अधिकारी एम. आय. देशमुख, नेताजी बोडके, महादेव माने, श्रीरंग थिटे, माऊली मुंढे, वैशाली म्हेत्रे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व साखरशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. महादेव चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT