पुणे

ऊसतोड कामगार घरी लवकरच परतणार; प्रशासनाकडून हालचाली सुरु

सकाळवृत्तसेवा

करंजगाव : कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ऊस तोडणी हंगाम संपला तरी ऊस तोडणी कामगार अद्याप मावळातच स्थायिक आहेत. परंतु शासनाकडून ह्या कामगारांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने नाणे मावळातील ऊस कामगारांच्या टोळ्या गावाला पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

कान्हे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कामगारांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली. नाणे मावळात एकोणीस टोळ्यांमध्ये सुमारे तीनशेहून अधिक कामगार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडकून पडले आहेत. ह्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन ,ज्यांचे आरोग्य चांगले असेल अशा कुटुंबांना गावी पाठवले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे विस्तार अधिकारी पांडुरंग मोहोळ यांनी दिली.

यावेळी मयूर भेगडे, सखाराम काळे, प्रकाश आडकर, रवींद्र जांभुलकर, ग्रामीण रुग्णालय कान्हे येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कामगारांना आपल्या गावी जाणे मुश्कील होवून बसले आहे. त्यात ऊसतोड बंद झाल्याने त्यांच्या जनावरांना खाण्यास चारा (वाढे) देखील उपलब्ध नाही. वाढे विकून त्यांना मिळणारी रोजची खर्चीही बंद झाली असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे.एकीकडे गावाला जाता येत नाही तर दुसरीकडे हातात पैसा व जनावरांना चारा नसल्याने हे कामगार हतबल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

SCROLL FOR NEXT