Shri M sakal
पुणे

Suhana Sakal Swasthyam 2023 : आरोग्य महोत्सवाची आजपासून पर्वणी

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव शुक्रवारपासून सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव शुक्रवारपासून (ता. १) रविवारपर्यंत (ता. ३) पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये सायंकाळी पाच वाजता सुरू होत आहे. उपक्रमाची सुरुवात संस्कृत व वैदिक मंत्र उच्चारणाने होणार आहे.

याचबरोबर अध्यात्म व योग गुरू श्री एम यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

सर्व वयोगटातील नागरिकांच्या निरोगी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वास्थ्यपूर्ण संतुलित जीवनशैलीसाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ या उपक्रमांतर्गत एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत ध्यान-धारणा, योग-प्राणायाम, शारीरिक, भावनिक व मानसिक स्वास्थ्यपूर्ण आरोग्य, अध्यात्म आणि आरोग्य, संस्कृतयोग, वैदिक मंत्र जप आणि मानसिक आरोग्य, मुद्रा-विज्ञान आणि आरोग्य आदी विषयांवर विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत.

उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत. याचबरोबर सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’. व ’फिनोलेक्स केबल्स लिमिटेड’, ‘भारत फोर्ज लिमिटेड’ असून, ईव्ही पार्टनर ‘एथर’ आहेत.

‘स्वास्थ्यम्’ कशासाठी?

१. संस्कृत व वैदिक मंत्रांचा जप आणि आरोग्य याबाबत मार्गदर्शन

२. ध्यान-धारणाविषयी शास्त्रीय माहिती

३. निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम यांचे मार्गदर्शन

४. अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध यासंदर्भात मार्गदर्शन

५. गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध याबाबत मार्गदर्शन

वस्तू-सेवांचे प्रदर्शन पाहण्याची संधी

आरोग्याच्या तीनदिवसीय महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात आरोग्य क्षेत्रातील विविध प्रकारच्या वस्तू, उत्पादने आणि सेवा, आयुर्वेदिक उत्पादने, हर्बल आणि विविध प्रकारची औषधी उत्पादने, आरोग्यदायी उपभोग्य वस्तू, जैविक (ऑरगॅनिक) उत्पादने, डायग्नॉस्टिक उत्पादने आणि सेवा, सिद्ध यंत्र आणि मंत्र उत्पादने, परफ्यूम, सुगंधी अत्तर, प्युरिफायर आणि अगरबत्ती उत्पादने आणि पर्यावरणपूरक व शाश्वत उत्पादने यांचा समावेश आहे.

कधी व कुठे?

१ ते ३ डिसेंबर- २०२३, पंडित फार्म्स,

कर्वेनगर, पुणे

हे लक्षात ठेवा

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी globalswasthyam.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. प्रवेश विनामूल्य असून, उपक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

खालील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भेट द्या

Instagram - instagram.com/globalswasthyam

Facebook - facebook.com/globalswasthyam

Twitter - twitter.com/GlobalSwasthyam

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

भयानक घटना! कॅनडाच्या खेळाडूचा पाय मोडला, वेदनेने कळवळला, रडला; स्ट्रेचरवरून सोडावे लागले मैदान; Video Viral

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज रात्री १० वाजता कोल्हापुरात येणार

SCROLL FOR NEXT