Superstition Elimination Committee Social Inspiration Award announced Herwad and Mangaon Gram Panchayats
Superstition Elimination Committee Social Inspiration Award announced Herwad and Mangaon Gram Panchayats sakal
पुणे

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) ‘सामाजिक प्रेरणा पुरस्कार’ जाहीर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या दिवशी (ता.३१) हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे त्याचे स्वरूप आहे.

सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराची कल्पना सुचविणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, डॉ. शैला दाभोलकर व अभिनेते किरण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातील, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीच्या वतीने देण्यात आली. पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिसने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT