मलठण ( ता. शिरूर ) - ओढ्याजवळ झाडावर आढळलेल्या पिशवीतील जादुटोण्याचे साहित्य.
मलठण ( ता. शिरूर ) - ओढ्याजवळ झाडावर आढळलेल्या पिशवीतील जादुटोण्याचे साहित्य. 
पुणे

नागरीकांनी पूढाकार घेऊन ही अंधश्रद्धा घालविणे गरजेचे आहे

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी - ग्रामीण भागात भानामती व जादूटोणा करत अघोरी उपाय करून उतारे करत नागरीकांना घाबरविण्याचे प्रकार होतात. असे करून कोणताही वाईट परीणाम होत नाही. पण अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरीकांनी पूढाकार घेऊन ही अंधश्रद्धा घालविणे गरजेचे आहे. असे मत पुणे अनिस च्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले.  

शिरूर तालुक्यातील मलठण येथील ओढ्याजवळ झाडावर काळ्या बाहुल्या, टाचण्या व काही नागरीकांच्या नावाची चिठ्ठी लिहून त्यावर रक्ताचे डाग असलेली पिशवी सापडली. त्यावेळी घाबरलेल्या नागरीकांना प्रबोधन करताना ते बोलत होत्या.

यावेळी पंचायत समिती सदस्य डॅा.सुभाष पोकळे, सरपंच कैलास कोळपे, दत्तात्रेय गायकवाड, चेतना ढमढेरे, डॅा. पार्वती कदम, सतीष शिंदे, युवराज थोरात उपस्थीत होते. 

जाधव म्हणाले की, बांदावरची भांडणे किंवा इतर किरकोळ भांडणातून घाबरविण्यासाठी असे प्रकार घडत असतात. असे नारळ, लिंबू आम्ही खाल्लेले आहे. आम्हाला काहीही झाले नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. मात्र यावर उपाय म्हणून असे प्रकार उघडीस आणले पाहिजे. त्यातून नरबळी सारखा प्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंद करणे आवश्यक आहे. असा प्रकार करणाऱ्यावर जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. 
 पोकळे म्हणाले की, या परीसरात अशिक्षीत नागरीक अधिक असल्याने असे प्रकार घडून येतात. पण असे प्रकाराला आळा घातला पाहिजे. अशा व्यक्तीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या बाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून नागरीकांनी अशा प्रकाराला घाबरू नये. असे आवाहन केले. 

या परीसरात अंगात येणे, जादुटोणा, भानामती करणे असे अनेक प्रकार घडतात. मागील काळात मलठण परीसरात नरबळीचा प्रकार उघडीस आणला होता. त्यानंतर देखील जादुटोणा चे प्रकार होतच आहेत. येथील झाडावर सरपंच कैलास कोळपे यांच्या घरातील सर्वांची नावे टाकून नारळ, लिंबू, टाचण्या, काळ्या बाहुल्या व रक्ताचे डाग असलेली पिशवी झाडाला टांगलेली आढळली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी ते सर्व साहित्य जाळून नष्ठ केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT