गट-तट बाजूला ठेवून भाजपला साथ द्या
शिवेंद्रसिंहराजे भोसले; जावळीतील कुडाळ गटात गिरी, शिंदे, पवारांसाठी प्रचार
आनेवाडी, ता. ५ : भाजप पक्षाच्या माध्यमातून सातारा- जावळी मतदारसंघात भरपूर विकासकामे केली आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघाला यापूर्वी गालबोट लागले होते. बेरजेचे राजकारण करायचे म्हणून काही निर्णय घेतले आहेत. नतद्रष्ट उमेदवारांच्या मार्गदर्शकांना घरी बसवायचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे गट, तट बाजूला ठेवून मी दिलेला उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कुडाळ जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार जयश्री सुहास गिरी, गणातील उमेदवार सौरभ शिंदे व चारुशीला पवार यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सुनेत्रा शिंदे, वसंतराव मानकुमरे, जयश्री गिरी, सुहास गिरी, मच्छिंद्र मुळीक, अनिता गायकवाड, हिंदुराव तरडे, समीर आत्तार, एकनाथ रोकडे, अंकुश शिवणकर, सुजित शिवणकर, नितीन खरात, लाला वंजारी, विजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुहास गिरी म्हणाले, ‘‘मी स्पष्टपणे सांगितलं होतं, की पक्ष जी माझ्यावर जबाबदारी देईल ती मी समर्थपणाने पार पाडणार आहे. कुटुंबावरील जबाबदारी वाढल्यानंतर मी व्यवसायात लक्ष केंद्रित केले. आता शिवेंद्रसिंहराजेंनी ज्या विश्वासाने जबाबदारी दिली आहे, त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही.’’
सौरभ शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही आता सर्वजण एकत्र येऊन शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली कुडाळ गट नक्कीच विजयी करणार आहे, कारण आता विरोधकांकडे विकासाबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. यावेळी अनिता गायकवाड यांचेही भाषण झाले.’’
...........................................
आमदार म्हणून चांगले रस्ते, पाण्याच्या सुविधा, शाळेच्या खोल्या, समाज मंदिरे, ग्रामपंचायत इमारत आणि शेतीला पाणी या विकासाच्या संकल्पना मांडल्या. ती कामे पूर्ण करून १५ वर्षांत मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विरोधक काय सांगतात, हे न ऐकता विकासकामे कोण करतेय ते पाहा. त्यामुळेच आम्ही मतदान मागत आहोत; परंतु काही जणांना निवडणुका आल्या, की जनतेची आठवण होते. त्यानंतर ते पुढील निवडणुकीतच आपल्याशी संवाद साधतील. अशांपासून सावध राहिले पाहिजे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
...........................................
फोटो :.........SAY26B02350
कुडाळ (ता. जावळी) : सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपस्थित जनसमुदाय. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.