Supriya Sule Comment on Start jeam and temple in pune 
पुणे

जीम, रेस्टॉरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत सुप्रिया सुळे यांची महत्वाची प्रतिक्रीया; म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात कोविडचा आलेख स्थिरावला असला तरी पण धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळं जिम, रेस्टॉरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल, असं सांगितलं. तसेच मंदिरे, मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे पण आज तारीख काय आहे, सध्या परिस्थिती काय, सर्वांनी थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. कोरोनाची साथ देशासह महाराष्ट्रात पसरत आहे. सध्या देशात महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या रुग्णसंख्येत आघाडीवर आहे, या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बोलत होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद आहेत. काल (ता. २६) महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षाही रद्द केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परिक्षांना देखील स्थगिती मिळाली असून, त्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर होईल. यावर बोलताना, अंतिम वर्ष परिक्षेबाबत मी सरकारबरोबर आहे, जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका असेल आणि या परिक्षांची फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
 

 सुप्रिया सुळे यांनी आज (ता. २७) (गुरुवार) पुण्यातील कोरोना परिस्थिती महापालिका आयुक्तांकडून जाणून घेतली. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील कोरोना रुग्णालयांबद्दलची माहिती घेतली. काही दिवसांपुर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीत आंदोलन केले होतं. याबद्दल राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक असून आणि ते एक ज्येष्ठ नेते आहेत. लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकार मधील फरक आहे. कारण, या अगोदरच्या सरकारमध्ये असं झालं असतं तर ते दडपलं गेलं असतं. अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT