Supriya Sule urges provide water tankers chara chavni in drought prone areas of Baramati Lok Sabha Constituency sakal
पुणे

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी

शासनाने जिल्ह्यातील या परीस्थितीचा तातडीने आढावा घेऊन, दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. पावसाळा संपत आला तरी बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यातील बहुतेक ठिकाणी अजूनही सरसरीइतका पाऊस पडलेला नसून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हातची पिके गेली, दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना प्यायला पाणी नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच चारा छावण्या सुरू कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रात केली आहे.

वरील सर्व तालुक्यातील ग्रामस्थांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती हेच आहे. या भागातील दुष्काळी परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी तसेच पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

शासनाने जिल्ह्यातील या परीस्थितीचा तातडीने आढावा घेऊन, दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याचबरोबर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सूरु करावेत, पशुधनाला नियमित चारा मिळण्यासाठी चारा छावणीचे नियोजन आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी, असे सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिवसातून ५ वेळा मशिदींवरील भोंगा वाजणार, सर्वोच्च न्यायालयाची नियमावली जारी!

Viral Video : 'चहा प्यायला चला'; पाकिस्तानी क्रिकेटपटू शिकतोय मराठी; नेटीझन्स म्हणतात, मनसे कडून सत्कार करा त्याचा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरमध्ये वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला

Nagpur Winter Session: लोहमार्गप्रश्नी आमदार अमोल खताळ यांचे निदर्शन; हिवाळी अधिवेशनादम्यान अनोखे आंदोलन, मार्ग बदलल्याने विकास खुंटणार !

Western Maharashtra Cold Wave : पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट; पुणे वेधशाळेचा हवामानाचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT