NCP
NCP 
पुणे

LokSabha 2019 : ''बारामतीत निवडणूक एकतर्फीच; सुप्रिया सुळे करणार हॅटट्रिक!''

सकाळवृत्तसेवा

इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांनी कामाच्या जोरावर सहा वेळा "आदर्श संसदरत्न' पुरस्कार मिळविला आहे. त्यामुळे सुळे यांना ही लोकसभा निवडणूक एकतर्फी असून, त्या यंदा विक्रमी मताधिक्‍क्‍याने विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केला. 

बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पळसदेव-बिजवडी गटातील पडस्थळ (ता. इंदापूर) येथे आयोजित गावभेट, तसेच जनसंवाद दौऱ्यात माने बोलत होते.

श्रीरंग बारणे-पार्थ पवार आले एकत्र!

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते पडस्थळ येथील कोटलिंगनाथांच्या चरणी अभिषेक करून या दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. 

'यांना उमेदवारी द्या.. नाहीतर काँग्रेस हारणारच!'

माने म्हणाले, "निवडणुकीपुरते राजकारण व निवडणुकीनंतर विकासकारण हे सूत्र केंद्रस्थानी मानून सुळे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सुळे यांचा विजय निश्‍चित आहे. मात्र, तो विक्रमी व्हावा यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे घरोघरी पोचविणे गरजेचे आहे.'' 

उदयनराजेंना कोण टक्कर देणार? रविवारी कळणार सगळ्यांना!

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल मारकड, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, अशोक चोरमले, ऍड. भारत जगताप, किसन जावळे, संपत पवार, गणेश भोंग, लक्ष्मण रेडके, प्रफुल्ल पवार, सुनील मोहिते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT