Pune Porsche Accident esakal
पुणे

'सुरेंद्रकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी धमकावून चालकाचा फोन काढून घेतला'; कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट!

आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद बी. एच. डांगळे यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. बर्डे यांनी अग्रवाल यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident Case) अल्पवयीन मुलासोबत असलेल्या चालकाचा मोबार्इल फोन सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी धमकावून काढून घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात (Court) दिली. सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना शनिवारी (ता. २५) सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान घटनास्थळावरून फिर्यादी यांचे कपडे आरोपीच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात आलेले आहे.

आरोपीचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाला असून त्या अनुषंगाने सविस्तर तपास करून पुरावा हस्तगत करावयाचा आहे. तसेच फिर्यादी यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी बीएमडब्लू गाडीचा (BMW Car) वापर केलेला असून ती गाडी शोधून जप्त करायची आहे, त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद बी. एच. डांगळे यांनी केला.

आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करत पोलिस कोठडीस विरोध केला. अपघाताच्‍या दिवशी अग्रवाल हे पत्नीसह दिल्लीला होते. आत्तापर्यंतच्या सर्व पोलिस तपासास त्यांनी सहकार्य केले असून ते परत आल्यानंतर पुण्यातच आहे. त्यांना अटक करताना अटकेची चेक लिस्ट पाळण्यात आलेली नाही.

अपघातानंतर स्वतःच्या जिवाचे काही बरे-वार्इट व्हायला नको म्हणून फिर्यादी अग्रवाल यांच्या बंगल्यात असलेल्या नोकरांच्या रुममध्ये थांबले होते, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. बर्डे यांनी अग्रवाल यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा एकमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करत आहेत.

मी दिल्ली होतो

अग्रवाल यांना शनिवारी दुपारी (ता. २५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? असे विचारले. त्यावर त्यांनी न्यायालयास सांगितले की, अपघात घडला तेव्हा मी पत्नीसोबत दिल्लीत होतो. त्यामुळे या सर्व प्रकाराची मला काही माहिती नसून त्यात माझा सहभाग नव्हता.

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर चार गुन्हे दाखल

अग्रवाल यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कलमांनुसार चार गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलिस ठाण्यात दोन, महाबळेश्वर आणि बंडगार्डन येथे त्यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्याबाबतची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत थंडी गायब, 'ऑक्टोबर हिट' चा चटका वाढला, आज राज्यातील 'या' भागांत पावसाचा इशारा

Devgad Hapus Mango : फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update : परवानगीसाठी प्रशासनाकडे आता तगादा लावणार नाही; काळा दिन फेरी काढण्‍याचा समितीचा निर्धार

Panchang 21 October 2025: आजच्या दिवशी तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

MLA Rohit Pawar: सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी : आमदार रोहित पवार; संजय शिरसाट यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT