rk-padmanabhan
rk-padmanabhan 
पुणे

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वेक्षण - आर. के. पद्मनाभन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘शहरातील मॉल परिसरातील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा,’’ अशा सूचना पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

चिंचवडगावातील वाहतूक विभागाच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १९) त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वाहतूक नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. 

याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘शहरातील अनेक मॉलसमोरील रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा होते. यावर तोडगा काढण्यासाठी तेथील कोंडीचे सर्वेक्षण करून त्यानुसार नियोजन केले जाणार आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘शहरातील वाहतूक नियोजनात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांमुळे समोरील वाहनचालकास धोका पोचू शकतो. त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. कोंडी टाळण्यासाठी सिग्नलच्या वेळेत वाहतुकीनुसार बदल केले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. अतिक्रमणे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात काम करावे लागते. पुढील काळात अधिक सुधारणा होतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT