sushma andhare mumbai india alliance 28 political parties unite politics sakal
पुणे

Sushma Andhare : सत्तेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच ‘इंडिया’ची बैठक - सुषमा अंधारे

‘देशातील लोकशाही व्यवस्थेबाबत चिंतन करण्यासाठी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत २८ पक्ष एकत्र आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशातील लोकशाही व्यवस्थेबाबत चिंतन करण्यासाठी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत २८ पक्ष एकत्र आले आहेत. त्यात होणाऱ्या विचारमंथनातून आगामी निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यात सत्तेची मुहूर्तमेढ रोवली जाईल,’’ असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘इंडिया’च्या बैठकीचे यजमानपद स्वीकारल्यावरून सत्ताधारी नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘ज्या नेत्यांनी ३७० कलम हटविण्यास विरोध केला.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची बदनामी केली, अशा पक्षांसमवेत तुम्ही कसे आहात?’ असा सवाल ठाकरे यांना केला होता. या मुद्यांवर अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.

अंधारे म्हणाल्या, ‘‘भाजपने काश्मीरमध्ये ३७० कलम हटवून काय दिवे लावले? त्याठिकाणी आजही सार्वत्रिक निवडणुका घेणे शक्य नाही. भाजपला सावरकर यांच्याबाबत खरेच प्रेम असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान का दिला नाही?’’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. त्यानंतर आरोप झालेले ते नेते दोनच दिवसांत भाजपसमवेत गेले. हा भ्रष्टाचाराचा मेळावा नव्हता का? तुमच्याकडे आल्यानंतर सगळा भ्रष्टाचार संपतो का?’’ असा सवाल त्यांनी केला. ‘‘पंतप्रधानपदासाठी ‘इंडिया’कडे सक्षम अनेक चेहरे आहेत.

पण नऊ वर्षांपासून तुमच्याकडे दुसरा चेहरा नाही. ‘देवेंद्र पर्व’ हे महाराष्ट्राच्या राजकारणात कपटनीतीचे पर्व म्हणून ओळखले जाईल. केवळ स्वतःच्या व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपोटी महाराष्ट्र आणि भाजपला त्यांनी बॅकफूटवर नेले,’’ असा आरोप त्यांनी केला.

नीतेश राणेंना ‘संस्कार’ विटामिनची कमतरता

अंधारे यांनी नीतेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘नीतेश यांना ‘संस्कार’ नावाच्या विटामिनची कमतरता आहे. तुम्ही मम्मी येणार असल्याचे उपरोधिकपणे बोलत आहात, पण त्यांच्याच मांडीवर बसून दहा वर्षे सत्तेचा उपभोग घेतला. त्यांच्या कृपेने जुहूचा बंगला घेतला, त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम केले. ज्यांचे दुधाचे दात पडले नाहीत, त्यांनी असे बोलू नये.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT