pune municipal commissioner rajendra bhosale sakal
पुणे

Pune News : पुरबाधित परिसरातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक आयुक्तावर निलंबनाची कारवाई

नागरिकांच्या तक्रारीनंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे महापालिकेच्या अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील पुरबाधित परिसराला पालकमंत्री अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर आणि नागरिकांच्या तक्रारीनंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे महापालिकेच्या अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत शनिवारी सिंहगड रस्ता क्षेत्रीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यास महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दुजोरा दिला. खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सिंहगड रस्ता परिसरासह मुठा नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे नदीकाठ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. सोसायट्या, घरे, दुकाने, बाजारपेठा, वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. "सकाळ'ने केलेल्या पाहणीत एकता नगरी, निंबोजनगर, विठ्ठलनगर या पुरबाधित परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, चिखल, गाळ साठला असूनही तेथे स्वच्छता केलेली नसल्याचे निदर्शनास आले होते.

पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍यांमध्येही पुराचे पाणी गेल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू होती. पुरस्थितीनंतरही महापालिका प्रशासनाकडून योग्य पद्धतीने काम झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी "सकाळ'कडे केली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनीही विठ्ठलनगर परिसरात पाहणी केली, त्यावेळी पुरबाधित परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ, कचरा व अस्वच्छता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पुरबाधित परिसर हा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये येतो. संदीप खलाटे हे या क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करणे आवश्‍यक होते. या प्रकाराला जबाबदार धरून तसेच त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त डॉ. भोसले यांनी खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT