पुणे

तीन महिने धान्य न घेतल्यास  शिधापत्रिका निलंबित

सकाळवृत्तसेवा

पुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेता येईल, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

सलग तीन महिने धान्य न घेणाऱ्या कार्डधारकांची ई-पॉस मशिनद्वारे संगणकांवर नोंद होते. त्या माहितीवरून शहर व पिंपरीतील ६४ हजार शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा थांबविण्यात आला आहे. याबाबत अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.

एप्रिल २०१८ पूर्वीपासून शिधापत्रिका असूनही, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळत नाही, त्यांना आता रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी भागातील व्यक्‍तीचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे, तर ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ४४ हजार रुपये इतकी आहे. त्यासाठी पुरवठा विभागाच्या कार्यालयात मोफत अर्ज उपलब्ध असून, त्यासोबत साध्या कागदावर वार्षिक उत्पन्नाबाबतचे हमीपत्र, आधार कार्ड आणि कुटुंबप्रमुखाचे छायाचित्र जोडणे गरजेचे आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांना सध्या रेशनवर धान्य मिळते, त्यांनी अर्ज करू नयेत, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे या वेळी उपस्थित होते.

यंदाच्या दिवाळीत ठेकेदाराने विलंब केल्यामुळे साखर मिळण्यास उशीर झाला. मात्र, शहरात सुमारे अडीच हजार क्‍विंटल साखर वितरित करण्यात आली आहे. दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना डाळी पोचवू शकलो नाही. परंतु येत्या दोन दिवसांत उडीद आणि चणा डाळ रेशनवर उपलब्ध करून देण्यात येईल.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 

अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक - दोन लाख ६१ हजार ७६०
अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक - आठ हजार ८०० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT