Vikas Pakhare
Vikas Pakhare Sakal
पुणे

नीरा नदीमध्ये पंढरपूर तालुक्यातील युवकाचा संशयास्पद मृत्यू

राजकुमार थोरात

पुणे व सोलापूर जिल्हाच्या सिमेवरील कुरवली (ता. इंदापूर) येथे नीरा नदीच्या पात्रामध्ये सोलापूर जिल्हातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला.

वालचंदनगर - पुणे व सोलापूर जिल्हाच्या सिमेवरील कुरवली (ता. इंदापूर) येथे नीरा नदीच्या पात्रामध्ये सोलापूर जिल्हातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला असून, संशयास्पद मृत्यू असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

येथील नीरा नदीच्या पात्रामध्ये विकास संभाजी पाखरे (वय २७, रा. भादलकोट, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांचा मृतदेह आढळला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवार (ता. १२) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रामध्ये विकास पाखरे यांचा मृतदेह पाण्यावरती तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. मृतदेह पाहण्यासाठी पुणे व सोलापूर जिल्हातील नागरिकांनी पुलावरती गर्दी केली होती.

वालचंदनगर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन केले. विकास पाखरे यांचे दोन्ही पाय घोटयाजवळ व दोन्ही हात मनगटाजवळ काळ्या रस्सीने बांधले होते. तसेच सिमेंटच्या खांबासोबत पोटावर काळ्या रंगाच्या रस्सीने बांधून पाण्यामध्ये टाकले असण्याचा पोलिसांचा संशय आहे.

पाखरे यांचे गाव पंढरपूर तालुक्यातील असून ते चालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मानकरवाडीचे पोलिस पाटील विलास कणसे यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

SCROLL FOR NEXT