Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

Prataprao Chikhlikar on Manoj Jarange : बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडून आले. तिकडे नांदेडमध्ये देखील जरांगे फॅक्टरमुळे भाजपला दणका बसला.
Prataprao Chikhlikar news
Prataprao Chikhlikar newsesakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचा लोकसभा निवडणुकीत भापला मोठा दणका बसला. भाजपने मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली होती. उपोषणकर्त्यांवर झालेला लाठीमार, आरक्षण देण्यासाठी तारीख पे तारीख, यामुळे मराठा समाज कंटाळला होता. त्यामुळे लोकसभेत ज्याला पाडायचं त्याला पाडा असे जरांगे म्हटले होते. याचे परिणाम लोकसभा निकालानंतर दिसून आले.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडून आले. विजयी झाल्यानंतर बजरंग सोनवणे मनोज जरांगे यांच्या भेटीला देखील गेले होते. तिकडे नांदेडमध्ये देखील जरांगे फॅक्टरमुळे भाजपला दणका बसला.

मनोज जरांगे फॅक्टरमुळे मला फटका बसला. अशोक चव्हाण यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले मात्र मी कुठेतरी कमी पडलो. म्हणून माझा पराभव झाला, असे प्रतापराव चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत झाली. यात वसंत चव्हाण विजयी झाले.

अशोक चव्हाण भाजपमध्ये आले. त्यांच्या नेतृत्वात मी नांदेडची निवडणूक लढवली. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मनोज जरांगे यांच्या फॅक्टर, मुस्लीम समाज फॅक्टर आणि संविधानाबाबत चुकीचा मॅसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचा फटका या निवडणुकीत मला बसला आहे, असे स्पष्टीकरण प्रतापराव चिखलीकर यांनी दिले.

Prataprao Chikhlikar news
"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघावर ताबा मिळविला व प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा यावेळच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी ५९ हजार ४४२ मतांनी चिखलीकरांचा पराभव केला.

चव्हाण यांना ५ लाख २८ हजार ८९४ मते मिळाली. तर भाजपचे चिखलीकर ४ लाख ६९ हजार ४५२ मते मिळाली.

Prataprao Chikhlikar news
Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भोकरमधून तब्बल ९७ हजार ४४५ मताधिक्य होते. त्यांच्याच बालेकिल्ल्यातून आता भाजपला केवळ दोन हजार ९२२ मतांची लीड मिळाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात झालेली पीछेहाट भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.