suspicious drone on bhigwan municipality building  esakal
पुणे

Baramati News : अज्ञात ड्रोनमुळे बारामतीकरात चिंतेचे वातावरण...

दरम्यान बारामती शहरातही अज्ञात ड्रोन उडताना दिसल्याने काळजीचे वातावरण आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - शहराच्या मध्यवर्ती भागात फिरणा-या अज्ञात ड्रोनमुळे बारामतीकरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेस भिगवण चौक परिसरात नगरपालिकेच्या इमारतीच्या वरील बाजूस तसेच आसपास हा ड्रोन फिरत होता, याचे व्हिडीओ चित्रीकरणच काही जणांनी केलेले आहे.

बारामती तालुक्याच्या जळगाव सुपे, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, खराडेवाडी या परिसरातही गेले काही दिवस अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत असल्याने त्या परिसरातही ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे. काल या परिसरात पोलिसांनी गस्त घातली, पण पोलिस येईपर्यंत ड्रोन गायब झाले होते.

दरम्यान बारामती शहरातही अज्ञात ड्रोन उडताना दिसल्याने काळजीचे वातावरण आहे. लाल व हिरव्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये होत्या व बराच काळ हा ड्रोन भिगवण चौकाच्या वरील बाजूस तरंगत असल्याचे छायाचित्रण काही जणांनी केले.

काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाला. हे ड्रोन कोणाचे आहेत, कशासाठी ते उडविले जात आहेत, याची ना पोलिसांना माहिती आहे, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्या मुळे या मागील गूढ अधिकच वाढले आहे. दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतलेली

असून दररोज रात्री शहर व तालुक्यात गस्त वाढविण्यासह सर्वच पोलिस कर्मचा-यांना या प्रकारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान बारामती व परिसरातील ड्रोन चालक व मालकांकडेही या बाबत पोलिस चौकशी करीत असून विमानतळाच्या रडारच्या मदतीनेही या ड्रोनचा शोध घेता येतो का हेही तपासले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT