पुणे

पुणे

CD

विड्याच्या पानांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी

तांबेवाडीतील ज्ञानेश्वर बांगर यांनी प्रतिकूल परिस्थितीत बाग टिकवली

आळेफाटा, जि. पुणे : जुन्नर तालुक्यातील तांबेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कोंडीबा बांगर यांनी मात्र प्रतिकूल परिस्थितीत विड्याच्या पानाची शेती टिकवून धरली आहे. त्यांनी आपल्या चार गुंठे क्षेत्रात शेवरीच्या झाडांचा आधार देऊन इंदापूरहून आणलेल्या ५५० रोपांची लागवड केली. सध्या त्यांना दररोज एक हजार पाने तोडणीसाठी मिळत असून, बाजारात १०० पानांना ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे.
जुन्नर तालुक्यात एकेकाळी वैभव असलेल्या विड्याच्या पानांची शेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढता खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या मदतीचा अभाव यामुळे गेल्या दहा वर्षांत पानमळ्यांचे प्रमाण घटले आहे. आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच मळे शिल्लक राहिले आहेत.
पानमळ्याच्या शेतीला वादळी पावसाचा मोठा फटका बसतो. एकदा पीक वाया गेले की शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच, या पिकाला शासनाचे कोणतेही आर्थिक साह्य मिळत नाही.
सध्या दररोज सुमारे एक हजार पाने उत्पादन निघत असून, चालू बाजारभावानुसार त्यातून दररोज सुमारे ४०० रुपये उत्पन्न मिळत आहे. हे पीक आणखी पाच वर्षे उत्पादन देणार आहे.

चौकट ----
पानांच्या संरक्षणासाठी शेवरी, हत्ती गवताचा आधार
बांगर यांनी चार गुंठे क्षेत्राची पान उत्पादनासाठी निवड केली. या पिकाला गारवा आवश्यक असतो. पाने सुकू नयेत यासाठी सावलीची गरज असते. त्यासाठी त्यांनी चार बाय सहा फुटांच्या अंतरावर सऱ्या काढल्या. त्यामध्ये शेवरीची झाडे पाच-पाच फुटांच्या अंतरावर लावली. तसेच चारही बाजूंनी हत्ती गवताची लागवड केली. त्यानंतर दोन महिन्यांनी ही झाडे मोठी झाल्यावर दोन शेवरीच्या झाडांच्या मधोमध इंदापूर येथून आणलेली ५५० रोपे लावण्यात आली.

कोट ----
अनेक शेतकरी हे पीक घेण्यासाठी धजावत नाहीत. या पिकाला बाजारात चांगले दर ही नाही. रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. औषधी गुणधर्म असूनही ही पारंपरिक शेती संकटात आहे.
- ज्ञानेश्वर बांगर, विड्याचे पान उत्पादक

फोटो ओळी ----
तांबेवाडी, ता. जुन्नर ः येथील विड्याच्या पानाचे पीक दाखविताना शेतकरी ज्ञानेश्वर बांगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT