पुणे

जाहीरात

CD

जाहीरात बातमी PNE26W15554

महाराष्ट्र दिनी शाश्वत
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
अहिल्यानगर, ता. २८ ः १ मे रोजी नगर-मनमाड रोडवरील शाश्वत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमास महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उच्च दर्जाची, तज्ज्ञ व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी शाश्वत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूपाने अहिल्यानगरच्या भूमीत आरोग्य सेवेचा नवा अध्याय सुरू करीत आहेत. ७० बेडसह २० आयसीयू व ३ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल होत आहे. अस्थिरोग, मेडिसिन, सर्जरी, किडनी विकार, स्त्रीरोग आदी आरोग्य सेवा हॉस्पिटलतर्फे उपलब्ध असतील. शाश्वत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या नावाप्रमाणेच शाश्वत रुग्णसेवा देण्यासाठी सुरू होत आहे.
हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कळमकर, फिजिशियन डॉ. प्रदीप कंठाळी, किडनी विकार तज्ज्ञ डॉ. आकाश बेरड, जनरल सर्जन डॉ. विश्वजित पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. योगिता दरेकर-पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपूर्वा माटे-कळमकर, भूलतज्ज्ञ डॉ. तेजल सागडे-कंठाळी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक्षा सोळंके-बेरड, युरोलॉजिस्ट डॉ. दीपक गाडेकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. दामोधर कळमकर आदी डॉक्टरांची टीम सज्ज आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा, रुग्णकेंद्रित सेवा या मूल्यांवर आधारित शाश्वत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्यसेवेचे नवे विश्वासस्थान ठरेल. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग २४ तास कार्यरत असेल. महाराष्ट्र दिनी रुग्णसेवेत रुजू होणाऱ्या शाश्वत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT