जुन्नरमध्ये 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाची सांगता
जुन्नरमध्ये 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाची सांगता 
पुणे

जुन्नरमध्ये 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाची सांगता

दत्ता म्हसकर

जुन्नर: 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाचा सांगता समारंभ आज (मंगळवार) जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडला.

या निमित्ताने जुन्नर पालिकेच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नवीन एस.टी.बस स्थानक सफाई, नदी घाटांची सफाई, परदेशपुरा बाजार परिसर सफाई, पंचलिंग झोपडपट्टीत श्रमदानातून स्वच्छता, जल स्त्रोतांची सफाई, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणी असे अनेक उपक्रम राबविले.  
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज जुन्नर शहरातून शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तहसीलदार कार्यालय आवारात पथनाट्य सादर केले. यावेळी परिसर स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनातील कचरा विलगीकरणाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तसेच जुन्नरचे पोलीस  निरीक्षक यशवंत नलवडे, उपनिरीक्षक स्मिता नवघरे व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य सभापती अंकिता गोसावी, आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री व सर्व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.  

सर्व उपस्थितांना शहर समन्वयक स्वप्नील जावळे यांनी स्वच्छता शपथ दिली. मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण-२०१९' मध्ये जुन्नर शहराला अव्वल आणण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन सर्व नागरिकांना  केले. सर्वांनी प्लास्टिक मुक्त जुन्नरचा संकल्प केला. स्वच्छता स्पर्धेत शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्व परिसराची श्रमदानातून स्वच्छता  केली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन आकाराम कवडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT