पिंपरी, ता. १० : पिंपरी चिंचवड महापालिकेत नागरिकांना प्रवेशासाठी ‘स्वागतम् ई-पास’ प्रणाली सुरू होणार आहे. तिच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरक्षा विभागावर सोपवली आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी अशीच प्रणाली वापरली जाते. तसाच निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ई-पास प्रणाली का?
- नागरिकांना महापालिकेत प्रवेश सुलभ करणे
- भेटीची डिजिटल नोंद ठेवणे
- कार्यालयीन सुरक्षा बळकट करणे
- प्रवेशाची नोंदणी घरबसल्या करता येईल
- महापालिकेत कमीत कमी वेळेत प्रवेश मिळेल
नागरिकांना सूचना
- संबंधित अधिकारी किंवा विभागाशी पूर्वनियोजित भेट निश्चित करूनच ई-पाससाठी अर्ज करावा
- प्रवेशद्वारावर ई-पासची पडताळणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल
- ई-पासमध्ये नमूद वेळ, तारीख व उद्देशासाठीच प्रवेश वैध राहील
- कार्यालयीन कामासाठी विभागांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी राहील
- अधिकाऱ्यांना मंगळवार व गुरुवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत भेटता येईल
प्रणालीचा लाभ असा घ्या
- महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध ‘स्वागतम् ई-पास’ लिंकद्वारे नोंदणी करता येईल.
- प्रथमच नोंदणी करणाऱ्यांना स्वतःचे खाते तयार करणे आवश्यक
- खाते तयार करताना पूर्ण नाव, पत्ता, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक नोंदवावा लागेल
- नोंदणी करताना तसेच पुढील प्रत्येक प्रवेशाच्या वेळी नागरिकांचा मोबाइल क्रमांक ''ओटीपी''द्वारे प्रमाणित केला जाईल
- प्रवेश नोंदताना नागरिकांनी किमान एक आणि कमाल तीन विभागांना भेट देण्याची विनंती नोंदवावी लागेल.
- नागरिकांना ई-पास काढायच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांपर्यंतचे (शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून) उपलब्ध दिनांक दिसतील, त्यानुसार आवश्यक दिनांक व विभाग निवडणे बंधनकारक
- नोंदणीनंतर नागरिकांना मोबाइलवर प्रवेशासाठी ‘क्यूआर कोड’ डाउनलोड करता येईल. हा ‘क्यूआर कोड’ महापालिका प्रवेशद्वारावरही उपलब्ध असेल
- आगाऊ नोंदणी नसणाऱ्यांना ‘क्यूआर कोड स्कॅन’ केल्यानंतरच प्रवेश मिळेल
पासचा गैरवापर केल्यास गुन्हा
कार्यालयीन कामकाज किंवा सुट्टीच्या दिवशी महापालिकेतर्फे आयोजित बैठकीस येणाऱ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यासाठी संबंधित विभागाचे पत्र आणि त्यावर भेटणाऱ्यांची नावे आवश्यक. तसेच, आंदोलनातील शिष्टमंडळांना मुख्य प्रवेशद्वारावर हस्तलिखित पास मिळेल. ई-पासचा गैरवापर, बनावट माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमांनुसार कारवाई केली जाईल.
PNE26W18108
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.