swarajya Sangathan over Maharashtra-Karnataka border Dispute Maharashtra vehicles in Karnataka sakal
पुणे

Maharashtra-Karnataka Dispute : कर्नाटकातील महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीला स्वराज्य संघटनेचे प्रत्युत्तर

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवली

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांची करण्यात आलेल्या तोडफोडीला पुण्यातील विश्रांतवाडी येथील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवली. या बसची हवा सोडून बसवर जय महाराष्ट्र लिहून त्यांनी कन्नडीकांचा निषेध केला. गेल्या काही दिवसात कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहने अडवून तोडफोड करून नुकसान करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र विरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याला पुण्यातील विश्रांतवाडी येथील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले.

पुण्यातील विश्रांतवाडी येथील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी कर्नाटक राज्य परीवहन मंडळाची बस खेड-शिवापूर टोल नाक्यावर अडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी बसच्या चाकातील हवा सोडून बसवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडीकांचा निषेध केला. सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना थांबवून सदर बस सोडून दिली. स्वराज्य संघटनेचे डॉ. धनंजय जाधव, गणेश सोनवणे, विनोद परांडे, अमोल वीर, निखिल काची , द्वारकेश जाधव, किरण राजपूत, विक्रम कदम, सुमित दरंदले, दादाराव बोबडे, आकाश लांडगे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT