टिळक स्मारक मंदिर - जोत्स्ना भोळे स्वरोत्सवात बहारदार गायन करताना सावनी शेंडे-साठ्ये. या वेळी (डावीकडून) भरत कामत (तबला), अक्षता गोखले व प्रीती पंढरपूरकर (तानपुरा) व राहुल गोळे (हार्मोनियम) साथ करताना.
टिळक स्मारक मंदिर - जोत्स्ना भोळे स्वरोत्सवात बहारदार गायन करताना सावनी शेंडे-साठ्ये. या वेळी (डावीकडून) भरत कामत (तबला), अक्षता गोखले व प्रीती पंढरपूरकर (तानपुरा) व राहुल गोळे (हार्मोनियम) साथ करताना. 
पुणे

स्वरोत्सवात रंगले ‘मेरो मन तेरा प्यासा गिरिधर’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जास्त करून सायंकालीन किंवा अधूनमधून सकाळचेच राग ऐकायला मिळतात. मात्र, दुपारचे राग ऐकण्याची दुर्मीळ संधी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’त मिळाली. सावनी शेंडे-साठ्ये व पंडित मधुप मुद्‌गल यांनी दिलखुलासपणे माधुर्य तसेच आर्ततेचा प्रत्यय देणारे राग ऐकवले.

‘मेरो मन तेरा प्यासा गिरिधर’ ही चारुकेशी रागातील विलंबित एकतालातील बंदिश गायिका सावनी शेंडे-साठ्ये गात होती. दोन दिवस चाललेल्या ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशीची मैफल आज दुपारी झाली. हा कार्यक्रम सृजन फाउंडेशन व नांदेड सिटीने आयोजित केला होता.

चारुकेशीमध्येच नंतर मध्यलय तीनतालातील ‘सांवरा नंद नंदन दिठ पड्या माई री’ ही बंदिश प्रस्तुत करून सावनीने ‘चलो हटो छोडो डगर श्‍याम’ ही द्रुत रचना सादर केली. नंतर वृंदावन सारंगमधील बंदिश ‘बाजत आनंदधून, वृंदावन डोलत श्‍याम बन्सी सुन सुन’ आणि पाठोपाठ ‘झूला डारो अंबुवा की डारी’ प्रस्तुत केली. शेवटी ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला. राहुल गोळे (हार्मोनिअम), रोहित मुजुमदार (तबला), माऊली टाकळकर (टाळ), अक्षता गोखले व प्रीती पंढरपूरकर (तानपुरा) यांनी साथ केली.

सुरवातीला ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर म्हणाल्या, ‘‘गायिका अभिनेत्री म्हणून आई जास्त प्रसिद्ध झाली. बालगंधर्वांनंतर एवढी लोकप्रियता मिळणे, हे विशेष. मात्र, आई मुळात उत्तम शास्त्रीय गायिका होती. नव्या पिढीतील शास्त्रीय व नाट्यसंगीत गाणाऱ्यांबद्दल तिला अप्रूप वाटत असे.’’

उत्तरार्धात पंडित मधुप मुद्‌गल यांनी देसी रागातील ‘मनवा मोरा’ या बंदिशीनंतर ‘दिन दिन मन’ ही द्रुत रचना सादर केली. मग लंकादहन सारंग रागातील आज ‘अंजन दियो’ ही रचना प्रस्तुत केली. मधमात सारंगमधील ‘रंग दे, रंग दे’ नंतर त्यांनी तराणा सादर केला. 

मुद्‌गल यांनी आपले गुरू पंडित कुमार गंधर्व यांची आठवण करून दिली. त्यांना अरविंद थत्ते (हार्मोनिअम), भरत कामत (तबला), सत्यजित बेडेकर व राज शहा (तानपुरा) यांची साथ होती.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य वसंत मराठे यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. डॉ. अजय वैद्य यांनी निवेदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT