Swayam Talks sakal
पुणे

Swayam Talks : आठ जणांचे आठ भन्नाट पैलू पाहून पुणेकर झाले खुश; 'स्वयं टॉक्स'ला मिळाला भरभरून प्रतिसाद 

Swayam Talks : 'स्वयं टॉक्स'च्या कार्यक्रमात आठ भन्नाट व्यक्तिमत्त्वांनी विविध विषयांवर अनुभव मांडून पुणेकरांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला पुण्यातील रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, आणि यूट्यूबवरही त्याचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

'जगात भारी' अशी ओळख असणाऱ्या पुणेकरांनी आठ भन्नाट व्यक्तिमत्त्वांना दिलखुलासपणे दाद दिली. निमित्त होते 'स्वयं टॉक्स' तर्फे आयोजित केलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे. रविवारी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात बाणेरच्या आलिशान बंटरा भवन सभागृहात दिवसभर हा कार्यक्रम रंगला.

आठ भन्नाट व्यक्तींनी मांडलेले विषय आणि अवाक करणारे अनुभव ऐकून पुणेकर खुश होऊन सभागृहातून बाहेर पडले. या कार्यक्रमाला 'सकाळ' वृत्तपत्र सह-आयोजक होते.कार्यक्रमात सहभागी झालेल्या वक्त्यांमध्ये एक होते, डॉ. राहुल मराठे. संपूर्ण जगाची डोकेदुखी झालेल्या प्रश्नांवर अर्थात प्लॅस्टिक खाणाऱ्या अळ्यांवर संशोधन आणि कीटकांचा वापर करून ते पर्यावरणपूरक उपाय शोधत आहेत.

सखोल अभ्यास आणि नाविन्यपूर्ण विषयात संशोधन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. दुसरे होते, १२ राज्यांत ३५० हार्ट क्लिनिकची ‘माधवबाग’ नावाने भव्य चेन उभारणारे तरुण मराठी डॉक्टर रोहित साने, जे आयुर्वेदाचा वापर करून हृदयविकाराच्या रुग्णांना 'संपूर्ण हृदय शुद्धीकरण' ही उपचारपद्धती यशस्वीपणे देत आहेत. तसेच भूषण कोरगांवकर, जे बहुशैलीतील, बहुभाषिक लेखक, संशोधक, दिग्दर्शक, अनुवादक, शिक्षक, नाट्यनिर्माते आणि गीतकार आहेत. लावणी कलाकारांना माणुसकीने वागवत त्यांच्या जीवनावर भूषण यांनी सखोल अभ्यास आणि लेखन केले आहे.

ते एक हरहुन्नरी लेखक आहेत. प्रेक्षकांनी लावणीचा आस्वाद तर घेतलाच पण भूषण यांच्याकडून लावणी कलाकारांचे एक वेगळे जग अनुभवता आले. त्याबरोबरच सध्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून परिचित असलेले सुनंदन लेले, ज्यांनी सचिन, विराट, धोनी सहित  क्रिकेटविश्वातील रोचक किस्स्यांनी भरलेली पोतडी रीती केली.

महाराष्ट्र अंडर १९ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पत्रकार, समालोचक अशी त्यांची मूळ ओळख आहे. या कार्यक्रमाला सुरेल रूप मिळाले ते 'बैठक' फाउंडेशनचे  मंदार कारंजकर व दाक्षायणी आठल्ये या दाम्पत्त्यामुळे! ज्यांनी तळागाळातील सामान्यांपासून ते सर्व स्तरातील रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लावली. त्यानंतर शालू कोल्हे ताई यांनी भंडारा- गोंदिया परिसरातील ६३ पुरातन तलावांचे जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवनाबाबत आपले अनुभवकथन केले.

कार्यक्रमाचा समारोप झाला तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्याबरोबर! ज्यांनी शिक्षणाचा सरधोपट मार्ग सोडून सुटसुटीत, मजेशीर आणि आनंदी शिक्षणपद्धतीचा फॉर्म्युला  तयार केला. तो अनुसरण्यासाठी राज्यभरातील आणि राज्याबाहेरील शिक्षक त्यांच्या शाळेला भेट देतात. त्यांच्यामुळे ५००० मुलांचे वेटींग लागले. या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे. या सर्व मान्यवरांशी संवाद साधला डॉ. उदय निरगुडकर यांनी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मिलिंद कुलकर्णी यांनी!

हे सगळे विषय पाहून कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याची खंत वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठीच 'स्वयं टॉक्स' तर्फे swayamtalks.org तसेच swayam talks या युट्युब चॅनेलवर कार्यक्रमांचे पुनर्प्रक्षेपण केले जाते. २०१४ पासून 'स्वयं टॉक्स' तर्फे असे मेंदूला टॉनिक देणारे कार्यक्रम अनेक ठिकाणी होत आहेत.

महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी विशेषतः मराठी भाषेत आयोजित केलेल्या सगळ्याच कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. आणि आता महाराष्ट्राची नवी 'सकाळ' आणखी ११ शहरांमधून होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणे ही मेंदूला चालना मिळण्याच्या दृष्टीने चांगली पर्वणी आहे. विशेषतः तरुणांनी, विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा हा कार्यक्रम तुमच्या शहरात कधी होणार हे जाणून घेण्यासाठी 'स्वयं टॉक्स' चे डिजिटल पोर्टल अवश्य फॉलो करा आणि अपडेट्स मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT