Crime Sakal
पुणे

पोलिसात तक्रार दिल्याने तलवारीने हल्ला

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून तलवारीने तसेच रॉडने मारून गंभीर जखमी करत दहशत पसरविणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिसांत (Police) तक्रार (Complaint) दिल्याच्या रागातून तलवारीने (Sword) तसेच रॉडने मारून गंभीर जखमी (Injured) करत दहशत पसरविणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक (Arrested) केली. यावेळी त्यांच्या साथीदारांवरही पोलिसांनी गुन्हे (Crime) दाखल केले आहेत. अनुराग संतोष मोरे (वय २०) आणि निकुल ऊर्फ तरुण संतोष मोरे (वय २०, दोघेही रा. भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Sword attack after reporting to police Crime)

याबाबत कासेवाडी येथे राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० मे रोजी मध्यरात्री कासेवाडी येथी सिद्धार्थनगर येथील आनंद मित्रमंडळाजवळ घडला. आरोपींनी फिर्यादी महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून फिर्यादीच्या भावावर रॉडने व तलवारीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

दरम्यान वाघोली गावाच्या हद्दीत असलेल्या विप्रो कंपनीच्या आवारात टेंपो भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस पठारे आणि सुरेश पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत किशोर भालचंद्र रोमन (२६, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT