पुणे

निदा खानला १४ दिवसांची कोठडी

CD

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : टीसीएस कंपनीतील तरुणीवर अत्याचार आणि सक्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा एजाज खान हिला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी हा आदेश दिला. तिला पोलिस बंदोबस्तात नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालय परिसरात मोठा पोलिस फाटा तैनात होता. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारची बाजू मांडली, तर बचाव पक्षाकडून ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निदाची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

पीडितेचे ‘हानिया’ नामकरण
या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवळाली कॅम्प परिसरातील पीडितेची मूळ ओळख पुसून तिचे ‘हानिया’ असे नामकरण करण्यात आले होते. तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव आणि प्रार्थना करण्याची सक्ती करून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न निदाने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

१७१ लिंक्स आणि आर्थिक रॅकेटचा तपास
‘एसआयटी’ने निदा खानकडून जप्त केलेल्या १७१ संशयास्पद लिंक्सचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाला आर्थिक रसद कुठून पुरवली जात होती, याचा शोध आता घेतला जात आहे. या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असण्याची शक्यता असून, लवकरच अन्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांची निदासोबत समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT