Teacher 
पुणे

शिक्षकांना मिळणार ७६ सुट्या

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६ सुट्या निश्‍चित केल्या आहेत.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शैक्षणिक सत्रात ३६५ दिवसांपैकी किमान २३७ दिवस शैक्षणिक कार्य झाले पाहिजे, असा नियम आहे. त्यानुसार ३६५ दिवसांत ५२ रविवार, १८ सार्वजनिक सुट्या, ३४ दिवस उन्हाळी सुट्या, १३ दिवस दिवाळी, नऊ वैकल्पिक सुट्या आणि विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीतील दोन सुट्या अशा एकूण १२८ सुट्यांचे दिवस आहेत, त्यात या वर्षात कमाल १२ किरकोळ रजा घेता येतील.

मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना वैकल्पिक अशा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत, २० मार्चला होळी, २३ मार्चला तुकाराम बीज, १२ जुलैला आषाढी एकादशी, ५ ऑगस्टला नागपंचमी, २४ ऑगस्टला गोपाळकाला, ७ सप्टेंबरला गौरी विसर्जन, २२ नोव्हेंबरला आळंदी यात्रा; तर ११ डिसेंबरला श्रीदत्तजयंती अशा वैकल्पिक सुट्या मिळणार आहेत; तर सहा सप्टेंबरला गौरी पूजा आणि १२ सप्टेंबरला अनंत चतुर्थी, विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीतील दोन दिवस स्थानिक सुट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. उन्हाळी सुटी ७ मे ते १४ जूनपर्यंत राहील. यंदा दिवाळीची सुटी २६ ऑक्‍टोबरपासून सुरू होत असून, नऊ नोव्हेंबरपर्यंत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनातर्फे घेण्यात आला. 

या वर्षात २३७ दिवस शाळा कामकाजांचे असून, वर्षातील ५२ रविवार धरून एकूण १२८ सुट्या शिक्षकांना मिळणार आहेत. 

यामुळे आहे नाराजी 
दरवर्षी दिवाळीची वीस दिवस असलेली सुटी यंदा तेरा दिवस आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. यंदा दिवाळीच्या सुटीत अनेक शिक्षकांना सहामाही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागली आहे. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीतीही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कांदा खरेदीतील अनियमिततेवर विधिमंडळात अर्धातास चर्चा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT