Farmer 
पुणे

शिक्षक राबतात कधी आपल्या शेतात, तर कधी दुसऱ्याच्या शेतात; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे - पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक शिक्षकांनी नांगर हाती धरला आहे. कधी आपल्या शेतात, तर कधी दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून ते राबत आहेत. हक्काचा पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

घोडेगावमधील जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असणारे समीर काळे सध्या स्वत:च्या शेतात काम करत आहे. ‘‘महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून विनावेतन काम करत आहे. परिणामी कुटुंबाची आर्थिक गणिते जुळवून आणण्यासाठी पार्ट टाईम काम करतो. लॉकडाउनपूर्वी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जात होतो. घराचा खर्च भागविण्यासाठी पाणीपुरीची गाडी सुरू करावी लागली,’’ असे काळे यांनी सांगितले. 

गेल्या पंधराहुन अधिक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात ज्ञानदानाची सेवा करणाऱ्या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. परिणामी हे शिक्षक पार्ट टाइम काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत; परंतु लॉकडाउनमुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

श्रीगोंदा येथील व्यंकनाथ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक निसार शेख म्हणाले, ‘‘शिक्षक म्हणून समाजात एक वेगळी प्रतिमा असते. त्यामुळे रेशनवर सामान आणायला गेलो, तरी ते मिळत नाही. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:च्या शेतातच पिकवून खावे लागत आहे.''

चंदननगर येथील पठारे महाविद्यालयातील शिक्षक दिलीप मोडक म्हणाले, ‘‘वेतनासाठी अनुदान मंजुर झाले, मात्र अद्याप त्यांचे वितरण करण्यात आले नाही. वारंवार मागणी करूनही सरकार या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही. पुण्यातील शिक्षकांची स्थिती बरी आहे; परंतु सोलापूर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूरमधील शिक्षकांची स्थिती दयनीय आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

१७ ऑगस्ट पंचांग! नागपंचमीसह श्रावणी सोमवार; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT