पुणे

जनगणनेच्या कामातून शिक्षकांना मुक्त करा!

CD

जनगणनेच्या कामातून
शिक्षकांना मुक्त करा!
शिवसेना (युबीटी) पक्षाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ११ : मुंबईतील शाळांत शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान विचारात घेता शिक्षकांना जनगणनेच्या कामातून तातडीने मुक्त करावे, अशी मागणी शिवसेना(युबीटी) केली आहे. शिक्षक हे शिकवण्यासाठी आहेत, जनगणना करण्यासाठी नाहीत, अशा शब्दांत नगरसेवक आणि शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
मुंबई महापालिकेने सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी पालिका शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील अध्यापन प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप अंकित प्रभू यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केला. या वेळी प्रभू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ दिला. अनेक शिक्षक वयोवृद्ध असून, त्यांना विविध व्याधी आहेत. अशा परिस्थितीत उन्हात फिरून माहिती गोळा करणे त्यांच्यासाठी शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असल्याचे प्रभू म्हणाले. या मागणीला सदस्या पूजा महाडेश्वर यांनी पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

श्रेयस तळपदे-काजल अग्रवाल पहिल्यांदाच एकत्र, 'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

SCROLL FOR NEXT