Teachers Strike  Sakal
पुणे

Teachers Strike : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा; विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी एकदिवसीय संप पुकारला

Old Pension Scheme : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शिक्षक भरती, जुनी पेन्शन व संच मान्यतेसाठी मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वात राज्यभर एकदिवसीय संप पुकारण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने १५ मार्च २०२४ मध्ये संच मान्यते संदर्भात घेतलेला शासन निर्णय रद्द करून २८ ऑगस्ट २०१५च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी, एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संस्थाचालक संघटना, विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना एकत्र करून शुक्रवारी राज्यभर एक दिवसीय संप पुकारला.

यानिमित्त पुण्यातही मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्यातील ८५० शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गासाठी संच मान्यतेत शून्य शिक्षक देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे अडीच ते साडेतीन हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्याचवेळी ७० ते ७५ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, असे महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी यावेळी सांगितले.

शासन निर्णय रद्द न झाल्यास अनेक अनुदानित विशेषतः मराठी शाळा बंद होण्याची भीती आहे, असे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

'आम्हाला एक गोड मुलगी झालीय...' कियाराने शेअर केली पोस्ट, लेकीच्या जन्मानंतर आई-बाबांचा आनंद गगनात मावेना!

Maharashtra Elections : उत्तर महाराष्ट्र सज्ज! ९७ लाख मतदारांच्या निर्णायक निवडणुकांची पूर्वतयारी

बंद घरात सापडला मानवी हाडांचा सापळा; जुना नोकिया फोनमुळं उलगडलं रहस्य, 'तो' चेंडू आणण्यासाठी घरात गेला अन्...

SCROLL FOR NEXT