Coronavirus
Coronavirus 
पुणे

कोरोनाला कंट्रोलमध्ये आणू शकते एकच शस्त्र; वाचा सविस्तर बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे - संपूर्ण जगात कोरोना विषाणूंच्या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक देश त्याचा फैलाव रोखण्याचा कसोशिने प्रयत्न करत आहेत. यासाठी कोरोना उद्रेकाचे नेकमेपणाने मॅपिंग, काटेकोर सर्वेलन्स, करोनोबाधित रुग्णांचे ट्रकिंग या प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा परिणामकारक वापर झाला. त्यामुळे आधुनिक काळात साथ रोग नियंत्रणात टेक्नॉलॉजी हेच प्रभावी अस्त्र असल्याचे यातून अधोरेखित होते. 

मॅपिंग
रुग्ण रहात असलेले ठिकाण, विलगिकरण केलेत्या लोकांचे स्थान, जीवनावश्यक वस्तू मिळतील अशी ठिकाणे या प्रत्येकाचे म्यॅपिंग केले जात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच जीआयएस आधारित म्याप-पोर्टलद्वारे दाखविले जाते. त्यातून पुढील धोरण निश्चित करण्यास मदत होत आहे. एकूण बाधितांची संख्या, मृत्यूंची संख्या, संपूर्ण बरे झालेल्यांची संख्या याचे देशनिहाय म्यॅपिंग झालेले दिसते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ट्रॅकिंग 
कोरोना संशयितांना इतरत्र कोठेही जाण्याची परवानगी नाही. पण तरीही हे संशयित इतरत्र ठिकाणी फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर डिजिटली नजर ठेवण्यासाठी फोक्सबेरी टेक्नॉलॉजीचे इमर्जन्सी डिसीजन सपोर्ट सिस्टीम व युनिटी जीओस्पेशलचे जीआयएस आधारित म्याप-पोर्टलचा वापरत अनेक महापालिका करीत आहे. याद्वारे प्रत्येक रुग्णावर डिजिटली नजर ठेवण्यात येत आहे. त्यासाठी डिजिटल कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये घरी विलगिकरण केलेले रुग्ण व कोरोनाबाधित यांचे मोबाईल ट्रॅक केले जात आहेत, त्यानुसार त्यांचे स्थान दर्शवले जाते. 

सर्वेलन्स
उद्रेक नियंत्रणासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यातून लोकांचे सर्वेलन्ससाठी ड्रोनसारख्या टेक्नॉलॉजीचा वापर होताना दिसतो. घराच्या गच्चीवर, गल्ल्यांमध्ये घोळक्याने जमलेल्या नागरिकांची अचूक माहिती टिपली जाते. 
  
जीआयएस वापर
जीआयएसचा उपयोग करून कोरोना रुग्णसंख्येनुसार लाल, नारंगी आणि हिरवा अशी वर्गवारी करण्यात आली. पंधरा पेक्षा जास्त रुग्णसंख्येचे जिल्हे लाल, पंधरा पेक्षा कमी जिल्हे नारंगी आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हिरव्या झोन दाखवण्यात येतात.

आरोग्य सेतू अँप
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेतू अॅहप विकसित केला आहे. संसर्गा झालेल्या व्यक्तींविषयीची माहिती देऊन कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता का, याबद्दल तुम्हाला अलर्ट करण्याची  यंत्रणात यात आहे. आरोग्यसेतू अॅेप सर्व अँन्ड्रॉईड आणि आयओएस उपकरणांवर डाऊनलोड करता येऊ शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे हे अॅसप मोफत आहे. 

टेक्नॉलॉजीने हे शक्य झाले
-    प्रभाग निहाय नकाशाचे थीम्याटीक म्यॅपिंग केले. म्यॅपपोर्टलद्वार रेड झोनमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर ब्यारिकेड कोठे लावायचे व अनावश्यक वर्दळ कशी थांबता येईल याचे नियोजन शक्य
-    रेड झोनमधून बाहेर व बाहेरून आत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत 
-    पोलीस फोर्स आवश्यकतेनुसार कोठे आणि किती असावी याचे नियोजन म्यापिंग केल्यामुळे सुकर 

केंद्राने जिल्हा, तालुका, महापालिका व ग्रामीण स्तरावर कोविड-१९चे म्यॅपिंग सुरू केले आहे, यामुळे सरकारला देशव्यापी लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची माहिती देण्यास मदत होईल.
- डॉ. श्रीकांत गबाले, संचालक, युनिटी जीओस्पेशल  

प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात कोरोना करिता कोविड क्रिटिकल केअर रुग्णालय निश्चित करण्यात आली आहेत त्यांचे स्थान व शासकीय रुग्णालयांचे स्थान नकाशांवरदाखवल्यामुळे प्रत्येक नागरिकाला याचा उपयोग  होऊ शकते.
- महेश पाठक, संचालक, युनिटी जीओस्पेशल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT