Technosavy
Technosavy 
पुणे

टेक्‍नोसॅव्ही ज्येष्ठ एकाकीच!

पांडुरंग सरोदे

सोशल मीडियावरचं मैत्र उठतंय जिवावर, खिसा होतो रिकामा
पुणे - पत्नीने काही वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. मुलगा-मुलगी परदेशामध्ये त्यांच्या कुटुंबांमध्ये रमलेले. काही वर्षे एकाकी जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठाने एकाकीपणावर सोशल मीडियाचा उतारा शोधला. एका अनोळखी महिलेने फेसबुकवर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारली आणि मैत्री वाढली. एक दिवस अचानक त्या महिलेने आपण दिल्लीत असून, आपल्याकडील मौल्यवान वस्तू सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडविली आहे. दहा लाख रुपये भरल्यास ती सोडतील, असे सांगितले. या ज्येष्ठाने ऑनलाइन रक्कम भरली आणि त्यानंतर त्या महिलेकडून कधीही प्रतिसादच मिळाला नाही! अशा प्रकारे एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा सोशल मीडियावर वावर वाढला असतानाच, दुसरीकडे त्यांच्या फसवणूक, लुबाडणुकीची समस्याही तितकीच गंभीर बनत आहे. 

पुणे जसे सांस्कृतिक शहर, तसेच ते पेन्शनरांचे म्हणूनही ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात नोकरी केलेले निवृत्तीनंतर पुण्यात स्थिरावण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा कौटुंबिक अडचणींमुळे, मतभेदांमुळे किंवा आप्त परदेशात असल्यामुळे ज्येष्ठांना एकाकी राहावे लागते. जोडीदाराच्या मृत्यूनंतर एकाकीपणा खायला उठतो. तो दूर करण्यासाठी, विरंगुळ्याकरिता मुला-मुलींशी, नातवंडांशी फेसबुक, व्हॉटस्‌ॲप, वायबर, स्काइपसारख्या माध्यमांतून ते संपर्कात राहतात. 

ज्येष्ठांच्या याच एकाकीपणाचा गैरफायदा घेऊन मदतनीस, नोकर किंवा नातेवाइकांकडून त्यांची मालमत्ता लाटण्याचा प्रकार होतो. दुसरीकडे सायबर गुन्हेगारही त्यांना लक्ष्य करतात. एकाकी ज्येष्ठ नागरिकांची सोशल मीडिया वापरापासून ते डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर, ऑनलाइन बॅंकिंग आणि मोबाईलद्वारे संपर्कातून आर्थिक फसवणूक वाढली आहे. या प्रकरणांची मोठी संख्या हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. अनेकदा ज्येष्ठ कुटुंबातील अन्य व्यक्‍तींशी संवाद न साधता इतरांच्या भूलथापांना बळी पडून अव्यवहार्य परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळे ज्येष्ठांनी जागरूकता राखणे आणि इतरांशी सल्लामसलतीने गुंतवणूक करणे उपयोगी ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या
    जोडीदार गेल्याने असुरक्षिततेची भावना
    मोठ्या प्रमाणात संवादाचा अभाव 
    विश्‍वासपात्र लोकांची वाणवा 
    विविध व्यवहारांसाठी मदतनिसांची गरज
    परक्‍या व्यक्तींबरोबरच नातेवाइकांकडून होणारी फसवणूक 

पुण्यामध्ये पाच ते सहा हजार ज्येष्ठ नागरिक एकटे राहात आहेत. विरंगुळा म्हणून किंवा विविध कामे, व्यवहाराच्या उद्देशाने ते सोशल मीडियाचा वापरतात. अनेकदा सोशल मीडियावर फसवणूक होते. त्याचे त्यांना दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी दक्षताच महत्त्वाची आहे.
- अरुण रोडे, अध्यक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)

गुन्हेगार एकाकी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांची लूट करतात. ज्येष्ठांची फसवणूक होऊ नये, त्यांना कोणापासूनही त्रास होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न होतात. ज्येष्ठ नागरिकांनादेखील घराजवळील पोलिस ठाण्याशी जोडून दिले जाते. स्थानिक पोलिस ज्येष्ठांची विचारपूस करतात, प्रसंगानुसार त्यांना मदत करतात, त्यांच्या अडचणीही सोडवतात. 
- स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT