पुणे

पोलिस आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना समन्स

CD

पिंपरी, ता.१० : वाकड येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दाखल घेतली आहे. अहवाल वेळेवर सादर न केल्याने आयोगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे.
प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वारंवार दिलेल्या त्रासाला कंटाळून वाकडमध्ये २०२३ मध्ये एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पॉक्सो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, पीडिताच्या वारसांना द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबतचा अहवाल तसेच ती रक्कम अदा केल्याचा पुरावा चार आठवड्यांच्या आत अनिवार्यपणे असताना तो अहवाल वेळेत सादर झाला नाही. सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे यांच्या तक्रारीवरून हे प्रकरण आयोगासमोर आले.
आयोगाचे उपनोंदणी अधिकारी (कायदा) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक अहवालांसह १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता आयोगासमोर व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
विहित मुदत उलटूनही आवश्यक अहवाल प्राप्त न झाल्याने आयोगाने समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला आणि आदेशाची एक प्रत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात सुरुवातीला वाकड पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली होती. नंतर, दीपक कांबळे यांच्या मागणीनुसार आणि पुढील तपासाच्या आधारे ॲट्रॉसिटी अंतर्गतही कलमे जोडली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT