crime
crime  sakal media
पुणे

भाईगिरी! टोळक्याकडून टेम्पो चालकाच्या डोक्‍यात दगड घातला; जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्ड येथून घरी जाणाऱ्या टेम्पो चालकास अडवून टोळक्‍याने लाथाबुक्‍क्‍यांनी व डोक्‍यात दगड घालून जबर मारहाण केली. या घटनेत टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

दयानंद भीमराव सीतापरराव (वय 30), सुमीत भीमराव सीतापरराव (वय 24,रा. निंबाळकर वस्ती, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्यासह विकी जाधव (वय 28) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिजीत दिघे (वय 35, रा. भारतनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टेम्पो असून वाहतुकीचा व्यवसाय आहे.

शनिवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास ते मार्केट यार्ड येथील काम संपवून घरी येत होते. त्यावेळी कात्रज येथील भारतनगर, निंबाळकरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा टेम्पो आला. त्यावेळी टोळक्‍याने त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. तर फिर्यादीच्या मदतीला येणाऱ्या नागरीकांनाही "आम्ही इथले भाई आहोत, कुणीही पुढे यायचे नाही, अन्यथा कोणाला सोडणार नाही' अशा शब्दात धमकी देऊन दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांनी पत्नी तेथे आली. त्यावेळी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच "आम्ही इथले भाई आहोत, जेलमधून सुटून आल्यावर तुम्हाला संपवू'अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT