court
court sakal
पुणे

Manchar Crime : अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणात आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा

डी. के. वळसे पाटील

मंचर - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीला पळवून नेले. तिला डांबून ठेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेश सखाराम धराडे (वय-३४, रा. येसरठाव, अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी याबाबतचा निकाल शुक्रवारी (ता.५) दिला आहे.

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. २० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४ या कालावधीत अल्पवयीन मुलीसमवेत सदर प्रकार घडला होता. याप्रकरणी मुलीला पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने मंचर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावेळी कार्यरत असलेले मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव व त्यांच्या पथकाने पोलिसांनी धराडे व पीडित मुलीचा शोध घेतला.

धराडेला अटक करून त्याच्याविरोधात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केला होता. त्याला अटक केली होती. त्यानंतर आरोपी दीर्घकालीन जामिनावर होता. सदर दावा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर सुरू होता. सरकारी वकील मिलिंद पांडकर, शुभांगी देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी धराडे यास दोषी ठरविण्यात आले. सद्य स्थितीतील दाव्याचे कामकाज पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, हवालदार एस. आर. बटवाल यांनी पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT