10th
10th sakal
पुणे

दहावीचा निकाल वाढला, तरीही घटला अकरावीचा ‘कट-ऑफ’

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य बोर्डाच्या दहावीच्या निकालात वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाचा ‘कट ऑफ’ ही वाढणार अशी शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात या प्रवेशाच्या पहिल्या नियमित गुणवत्ता यादीचा ‘कट-ऑफ’ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येते. (Pune News)

इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. त्यानुसार शहरातील नामांकित महाविद्यालयाचा विज्ञान शाखेसह कला शाखेचाही ‘कट ऑफ’ यावर्षीही नव्वदीपार आहे. परंतु नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेने कमी झाल्याचे वास्तव आहे.

गेल्या वर्षी फर्ग्युसन महाविद्यालयाचा कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) ९७.४० टक्के, तर विज्ञान शाखेचा ९७ टक्के होता. तर यंदा कला शाखेचा कट-ऑफ ९७ टक्के, तर विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९६.४० टक्के आहे. बीएससीसीचा कट-ऑफही गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी घसरला आहे. तर सिंबायोसिस महाविद्यालयातील गेल्या वर्षीच्या तुलनेत कट-ऑफ तब्बल तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) कट ऑफ दोन टक्क्यांनी, तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ तीन टक्क्यांनी घसरला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयातील कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे चित्र आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील पहिल्या नियमित फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) :

महाविद्यालयाचे नाव : कला : वाणिज्य : विज्ञान

  1. फर्ग्युसन महाविद्यालय : ९७ टक्के (इंग्रजी), ८४.८ टक्के (मराठी) : --- : ९६.४ टक्के

  2. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय : --- : ८३.८ टक्के : ९७ टक्के

  3. बीएमसीसी : --- : ९५.२ टक्के : ---

  4. मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर : ८९.८ टक्के (इंग्रजी), ६७ टक्के (मराठी) : ८७.८ टक्के : ९२.८ टक्के

  5. स. प. महाविद्यालय : ९३.४ टक्के (इंग्रजी), ७३.६ टक्के (मराठी) : ८९.६ टक्के  : ९२.८ टक्के

  6. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : --- : ९१.२ टक्के : ---

  7. सिंबायोसिस महाविद्यालय : ९३.४ टक्के : ९१ टक्के : ---

  8. आबासाहेब गरवारे महाविद्यालय : ६८ टक्के (मराठी माध्यम) : --- : ९१.६ टक्के

  9. महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय : ६५ टक्के : ७५.२ टक्के : ९३.८ टक्के

  10. नूमवि हायस्कूल आणि कनिष्ठ  

  11. महाविद्यालय : --- : ८१ टक्के : ८८.६ टक्के

  12. नेस वाडिया महाविद्यालय : --- : ८४.६ टक्के : ---

  13. नौरोसजी वाडिया महाविद्यालय : ८८ टक्के (इंग्रजी) : --- : ८८.२ टक्के

  14. सिटी प्राइड कनिष्ठ महाविद्यालय : --- : ८२.४ टक्के : ८८.२० टक्के

  15. एस. एम. जोशी महाविद्यालय : --- : ८३.२ टक्के : ८७.८० टक्के

घराजवळच्या महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची पसंती

‘‘कोरोनामुळे बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी पाठविताना पालक गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले नसावेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण होणार असल्याने शहरातही विद्यार्थ्यांनी देखील घराजवळच्या महाविद्यालयांना पसंती दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल वाढूनही प्रवेशाचा कट-ऑफ मात्र कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.’’

- डॉ. सविता दातार, प्राचार्य, स. प. महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT