UPR26B07544
पंढरपूर ः क्रिकेट आंदोलनात सहभागी झालेले ठाकरे युवा सेनेचे कार्यकर्ते व खेळाडू.
रस्त्यावर क्रिकेट खेळत युवा सेनेचे क्रीडा संकुलालासाठी आंदोलन
पंढरपूर विकास आराखड्यात क्रीडा संकुलाचा समावेश करण्याची मागणी
पंढरपूर, ता. २५ : पंढरपुरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी युवा सेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. युवा सेनेचे शहराध्यक्ष संग्राम अभंगराव यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती.
पंढरपूर शहरामध्ये सर्व सोयींनीयुक्त असे क्रीडासंकुल उभारावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधी व शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर उतरून क्रिकेट आंदोलन केले. या आंदोलनामध्ये खेळाडूंचा क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंढरपूर परिसरामध्ये अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. अनेक खेळाडू विविध ठिकाणी जाऊन सराव करत आहेत. स्थानिक खेळाडूंना बाहेरगावी जाऊन सराव करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खेळाडूंची आर्थिक कुचुंबना होत आहे.
सध्या पंढरपूर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या विकास आराखड्यात क्रीडा संकुलाचा समावेश करावा. अन्यथा येत्या काळात क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अभंगराव यांनी दिला आहे.
आंदोलनामध्ये यावेळी क्रिकेटप्रेमी विजय अभंगराव, स्वप्नील शिरसाट, वैभव बडवे, अर्जुन पवार, अवधूत बडवे, अमित पाटेकर, आनंद मिलगे, सूरज पेंडाल, पैलवान सिद्धेश्वर कोरे, अनिल परमार, महावीर अभंगराव, समाधान रोंगे, विविध क्रीडाप्रेमी, क्रीडापटू तसेच शहर युवा सेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.