आमदार गिरीश महाजन sakal
पुणे

Girish Mahajan : वयोमर्यादेबाबत गृहमंत्र्यांशीबोलून मार्ग काढला जाईल; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आश्‍वासन

असे आश्‍वासन पोलिस भरतीच्या वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः पोलिस भरतीसाठीची वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्यासमोर याबाबतची वस्तुस्थिती मांडून, याबाबत तोडगा काढला जाईल. यासाठी येत्या मंगळवारी (ता. २५) एक बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता.२२) पोलिस भरतीच्या वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज सायंकाळी ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाणे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले होते. हे उपोषण स्थगित झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषणस्थळी महाजन यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. यावेळी या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांनी हे आश्‍वासन दिले. कोरोना काळानंतर गेल्या दोन वर्षांपासून सरकारने पोलिस भरती केली नाही. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुण-तरुणींना एक संधी द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी महाजन यांच्याकडे केली.

वयोमर्यादा ओलांडल्याने पोलिस भरतीपासून वंचित राहिलेल्या तरुण-तरुणींची राज्यभरात मोठी संख्या आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तरुणांना फटका बसत आहे. गेल्या दोन वर्षापासून आरक्षणाच्या मुद्यामुळे भरती न झाल्यानेच हा प्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. सध्या सुरु असलेली पोलिस भरती ही सन २०२२ मधील आहे. परंतु राज्य सरकारने मुलांचे वय मात्र सन २०२४ चे ग्राह्य धरले आहे. याचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. परिणामी केवळ सरकारने चुकीच्या पद्धतीने केलेल्या वय गणनेमुळेच विद्यार्थी पोलिस भरतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला एक संधी द्यावी, अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी महाजन यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT