suicide sakal
पुणे

आईचा खून करून; मुलाने घेतला गळफास

धनकवडी येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांच्या मृत्युने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या एका मुलानेच आपल्या वयोवृद्ध आईला औषधाचा जादा डोस देऊन खुन केल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धनकवडी परिसरात ही घटना घडली असून शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश मनोहर फरताडे (वय 42, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे गळफास घेणाऱ्या व्यक्तिचे तर निर्मला मनोहर फरताडे (वय 76) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी शोनित तानाजी सावंत (वय 36, थोरात कॉलनी,एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा त्याच्या आईसमवेत धनकवडी परिसरातील अक्षय गार्डन सोसायटीमध्ये राहात होते. गणेश हा बेरोजगार होता, तसेच त्याने अनेकांकडुन कर्जही घेतले होते. त्यामुळे त्याच्याकडे अनेक जणाचे पैसे अडकले होते.

त्यातच आईचे आजारपणालामुळे तो त्रस्त झाला होता. या सगळ्या प्रकाराला कंटाळल्याने त्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आईला औषधाचा जादा डोस दिला, आई निपचीत पडल्यानंतर त्याने आईच्या तोंडाभोवती प्लॉस्टिकच्या पिशवी गुंडाळली, तसेच दोरीच्या सहाययाने आईचा गळाला आवळत तिचा खुन केला. त्यांनंतर त्याने स्वत: बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT