Junnar News sakal
पुणे

Junnar News : शेतकरी व्यक्त झाला कवितेतून ; अवकाळी पावसामुळे झाले पिकांचे नुकसान

जुन्नर परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे गव्हू,हरभरा,काढणीसाठी आलेला कांदा या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अमोल थोरवे

ओझर : ता.जुन्नर परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे गव्हू,हरभरा,काढणीसाठी आलेला कांदा या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.कापणी करून शेतात वाळत असलेली पिके भिजली असून उभ्या पिकांलाही चांगलाच फटका बसला आहे तसेच शेतातील इतर पिकांचेही नुकसान झाल्याचे पहावयास मिळते.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शिरोली खुर्द (ता.जुन्नर) येथील अजित मोरे शेतकऱ्याने चक्क कवितेच्या माध्यमातून आपली कैफियत मांडली आहे.त्यांची हि कविता सध्या सोशियल मिडियावर व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.स्वतःच्या शेतमालाचे पावसाने नुकसान होत असताना,हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेत असताना कवी मनाच्या शेतकऱ्याला कविता सुचते यातूनच शेतक्याचे मन किती मोठे असते आणि शेतकरी किती धिराचा असतो याची प्रचिती येते.

"हरभरा "

कैक वर्ष होते ऊस कांदे

म्हणलं बदली करु बिवड

पीक यायचे झाले वांदे

मग हरभऱ्याची केली निवड

माती परीक्षण करून पाहिले

पिकांचे शास्त्र आहे यापाठी

मातीत अन्नघटक नाही राहिले

हरभरा मुळावर असतात गाठी

आज चार महिने झाले

पेरला वावरात हरभरा

सर्व पाणी भरून झाले

मोड आले वर तरातरा

काबुली मिळाला औंदा वाण

त्याचे नांव होते डॉलर

पीक आले एकदम छान

टाईट झाली माझी कॉलर

आयाबायांनी खुडली भाजी

फांदी फांदीला झाला फुटवा

तोही मग झाला वाढीला राजी

मस्त भरगच्च झाला ताटवा

खता औषधांचा केला मारा

पाणी भरले रात्री पहाटे

ढवळ्या रंगाचा आला फुलोरा

पानापाना आड भरले घाटे

मित्र आले,गणगोत आले

मस्त केली हुळा पार्टी

हुळा खाऊन सर्व खुष झाले

खुष झाली पोरं कार्टी

सगळे घाटे झाले पिवळे

एकही नाही राहिला हिरवा

काढायला पक्व झाले सगळे

झाला करडा नच राही गारवा

पहिल्यावानी व्हत नाही काम

फाट्यावरून मजूर आणले मोलाने

गड्यांना मोजाया लागतं दाम

मजूरच हालाना काही केल्याने

हरभरा याटाळून घातली कडपं

थोडा तापून म्हणलं करून टाकू

अवकाळीने घातलीच झडप

तो आल्यावर कोणतं कडीप झाकू!

-अजित मोरे,शिरोली खुर्द : 7588034507

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT