Pune News Esakal
पुणे

Pune News: पुण्यात विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चौघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील भोर मधील निगडी या गावामध्ये ही घटना घडली आहे

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मधील निगडी या गावामध्ये ही घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागून या चौघांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील निगडे ता.भोर येथे नदीपात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यु झाला आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मयत चौघेही निगडे गावातील आहेत. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय.४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५, सर्वजण रा निगडे) या चौघांचा मृत्यु झाला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडे गावच्या हद्दीत गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधाऱ्याच्या बँकवॉटरमध्ये विठ्ठल मालुसरे यांची पाण्याची मोटार टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी चौघेजण मोटार घेवून पाण्यात ढकलत होते. त्यावेळी विजेचा शॉक बसला. पाण्यात वीजेचा प्रवाह आल्यामुळे चौघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. शेजारी शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा वीजप्रवाह बंद केला.

घटनेची माहिती मिळताच वीज महावितरणचे भोरचे उपअभियंता संतोष चव्हाण, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, आमदार संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कुलदीप कोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनाम्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. सनी व विठ्ठल मालुसरे या पितापुत्राचा आणि भावकीतील अमोल मालुसरे व गावातील आनंदा जाधव या चौघांचा जागीच मृत्यु झाल्यामुळे निगडे गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT