Pune Municipal
Pune Municipal Sakal
पुणे

आंबेगावात गोठलेले राजकीय वातावरण श्रेयवादावरून तापले

किशोर गरड

आंबेगाव बुद्रुक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव परिसरात श्रेयनाट्य रंगायला लागले आहे. दरम्यान,आंबेगावात स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकाच विकासकामाचे दोन भूमिपूजन सोहळे केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हस्याचे व चर्चेचे पेव फुटत असून, एकाच पक्षातील स्थानिक गटबाजी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघड झालेचे चित्र दिसून येते आहे. तर इतर कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी संभ्रमाची स्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे.या सगळ्या श्रेयवादाच्या सावळ्या गोंधळात तेच फावडे, तेच घमेले फक्त लोकप्रतिनिधी व नारळ वेगळे अशी स्थिती ठेकेदार व नागरिकांना अनुभवायला मिळते आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचा विशेष जिव्हाळा असणाऱ्या,राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव परिसरात पक्षांतर्गत गटबाजी पक्षाच्या पल्ली पडणार नाही असे मत स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या स्थानिक भाजपा ऍक्टिव्ह मोडवर असून प्रभागात,कीट वाटप,आरोग्य शिबिरे,सोसायट्यांमध्ये गाठीभेटी,शासकीय योजना आदी कार्यक्रम परिसरात राबवताना दिसत आहेत. तर नागरिकांकडूनही भाजपाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. राष्ट्रवादीची अंतर्गत गोटातील असणारी श्रेयवादाची रस्सीखेच प्रभागात कमळ फुलविण्याचे संकेत देत आहे का? असा सवालही सर्व सामान्य करताना दिसत आहेत.

शिवाय याच प्रभातून मनसे शहराध्यक्ष लोकप्रतिनिधी असल्याने त्यांचीही मोर्चे बांधणी परिसरात जोर धरत आहे. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता मनसेकडेही कानाडोळा करून राष्ट्रवादीला चालणार नाही. तर शिवसेना अजूनही वेट अँड वॉच मोडवर आहे. तूर्तास,अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांसह विद्यमानांचे लक्ष लागले आहे. याचा विचार करता येणाऱ्या हिवाळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र आंबेगावात दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT